News Flash

7,000 रुपयांनी स्वस्त झाला Oppo चा ‘प्रीमियम स्मार्टफोन’, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

'प्रीमियम स्मार्टफोन' खरेदी करण्याच्या विचारात असलेल्यांसाठी चांगली बातमी...

जर एखादा प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर चांगली संधी आहे. कारण, स्मार्टफोन कंपनी Oppo ने आपला प्रीमियम स्मार्टफोन Oppo Find X2 च्या किंमतीत कपात केली आहे. कंपनीचा हा दमदार स्मार्टफोन आता 7,000 रुपयांनी स्वस्त झाला आहे. जाणून घेऊया Oppo Find X2 चे फिचर्स आणि नवीन किंमत :

Oppo Find X2 की स्पेसिफिकेशन
Oppo Find X2 मध्ये 6.7 इंचाचा क्वॉड एचडी प्लस डिस्प्ले असून क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसरचा सपोर्ट आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 10 वर आधारित ColorOS 7.1 ऑपरेटिंग सिस्टिमवर कार्यरत आहे. या फोनमध्ये ड्युअल सिम कार्डचा सोबत असून इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरही आहे. फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यातील मुख्य कॅमेरा 48MP क्षमतेचा आहे. तर 12MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 13MP टेलीफोटो लेन्सचा सपोर्ट मिळेल. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी पुढच्या बाजूला 32MP चा कॅमेराही आहे. शिवाय 65W SuperVOOC फ्लॅश चार्जिंगचा सपोर्ट असलेली 4200mAh क्षमतेची बॅटरी यात आहे. SuperVOOC फ्लॅश चार्जिंगद्वारे हा फोन फक्त 10 मिनिटात 40 टक्के आणि 38 मिनिटात पूर्ण चार्ज होतो असा कंपनीचा दावा आहे.

Oppo Find X2 नवीन किंमत :-
Oppo Find X2 हा स्मार्टफोन कंपनीने गेल्या वर्षी जूनमध्ये लाँच केला होता. त्यावेळी या फोनची किंमत 64 हजार 990 रुपये होती. पण, आता किंमतीत 7,000 रुपयांची कपात झाल्यामुळे हा फोन 57 हजार 990 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2021 3:11 pm

Web Title: oppo find x2 gets price cut of rs 7000 in india check new price specifications and other details sas 89
Next Stories
1 ‘मेड इन इंडिया’ स्मार्टफोनवर खास डिस्काउंट, फक्त आजच 10 हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदीची संधी
2 20 हजारांपेक्षा कमी किंमतीत लाँच झाला 108MP कॅमेरा क्षमतेचा Realme 8 Pro, जाणून घ्या खासियत
3 भरुदड नव्हे, लाभच!
Just Now!
X