वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाइल असोसिएशनच्या(WIAA ) शतकमहोत्सवाच्या निमित्ताने विविध प्रकारच्या सुपर कार्स आणि बाइकसोबत व्हिंटेज कार्स आणि व्हिंटेज बाइक्सचं भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. एमएमआरडीए मैदान, बीकेसी येथे 8, 9 आणि 10 फेब्रुवारी 2019 रोजी हे प्रदर्शन होत आहे. सकाळी 9 ते संध्याकाळी 6 दरम्यान हे प्रदर्शन सुरू असेल. ऑडी, मर्सिडीज, मॅसरेटी, लॅम्बोर्गिनी, अॅस्टन मार्टिन, पोर्श, फेरारी, बेंटले आणि रोल्स रॉइस अशा प्रसिद्ध सुपर आणि लक्झरी कार ब्रँड्ससोबतच सुपर कार्सही पहिल्यांदाच पार्क्स सुपर कार शोमध्ये पहिल्यांदा सहभागी होणार आहेत. याशिवाय ‘सुपर कार क्लब ऑफ इंडिया’ मुंबईच्या प्रमुख रस्त्यांवर 10 फेब्रुवारी 2019 रोजी त्यांच्या खास गाड्यांसह परेड काढणार आहे.

‘पार्क्सद्वारे सादर केला जात असलेला मोटर शो भारतातील सर्वात अनोखा शो आहे आणि इतक्या वर्षांत प्रतिष्ठित शो म्हणून त्याची ओळख तयार झाली आहे. या आवृत्तीमध्ये डब्ल्यूआयएएचा शतकमहोत्सवही साजरा केला जाणार असून त्यात विविध सुपर कार्स, व्हिंटेज व क्लासिक कार्स, व्हिंटेज बाइक्स व सुपरबाइक्सचा ताफा या सोहळ्याचा भाग असेल. आम्हाला विश्वास वाटतो, की हा वार्षिक महोत्सव आणखी मोठा व चांगला बनेल.” असं रेमंड लिमिटेड(अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक) आणि सुपर कार क्लबचे संस्थापक अध्यक्ष गौतम सिंघानिया म्हणालेत.

‘या १०० वर्ष जुन्या संघटनेचा अध्यक्ष या नात्याने भारतातील व्हिंटेज व सुपर कार्स आणि बाइक्सचा भारतातील सर्वात मोठा ऑटो शो डब्ल्यूआयएएच्या शतकमहोत्सवी वर्षात मुंबईत भरवला जाणार आहे, याचा मला अभिमान वाटतो. डब्ल्यूआयएए शतकमहोत्सवी वर्षात असल्यामुळे दुहेरी सेलिब्रेशनाची संधी आहे आणि डब्ल्यूआयएएमध्ये आम्ही या मोटरिंग सोहळ्याचा भाग होताना आनंदित झालो आहोत.’ असं डब्ल्यूआयएएचे अध्यक्ष विवेक गोयंका म्हणाले.

‘पार्क्स’बद्दल –
पार्क्स हा प्रीमियम कॅज्युअल लाइफस्टाल ब्रँड आहे, जो आयुष्यातल्या वेगवेगळ्या प्रसंगांसाठी आवश्यक ड्रेसिंगच्या शोधात असलेल्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करतो. पार्क्स हा ब्रँड २२ ते ३० वर्ष वयोगटातल्या उत्साही, आक्रमक, दमदार आणि आयुष्य मनसोक्त जगणाऱ्या तरुणांचे व्यक्तिमत्त्व प्रतिबिंबित करतो. पार्क्सने आपला स्वभाव आणि तेजतर्रार वृत्तीचे प्रतिंबिब असलेल्या कपड्यांची निवड करणाऱ्या नव्या पिढीची नस अचूक पकडली आहे. १९९९ मध्ये स्थापना झाल्यापासून पार्क्स कॅज्युअल वेयर सेगमेंटमधील सातत्यपूर्ण नाविन्य आणि आंतरराष्ट्रीय ट्रेंड्स व स्टायलिंग पसंतीचा ब्रँड ठरला आहे. कामापलीकडच्या आयुष्यातील कपड्यांची गरज पुरवणारा ब्रँड असे त्याचे स्थान असून स्पोर्ट आणि क्लबसारख्या विभागांतून या गरजा पूर्ण केल्या जातात. दर्जावर भर देण्यासाठी हा ब्रँड पूर्ण प्रयत्न करतो. उत्पादनासाठी सर्वोत्तम यंत्रणा, तंत्र, ट्रॅकिंग यंत्रणा व प्रक्रिया वापरली जाते. यातील बहुतांश भाग स्वयंचलित आहे.