स्मार्टफोनच्या किंमती मागच्या काही काळात कमी झाल्याने कंपन्यांमधील स्पर्धा वाढली आहे. कंपन्या आपल्या ग्राहकांना घसघशीत सूट देऊन आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातच पेटीएमसारख्या अॅप्लिकेशनकडूनही ग्राहकांना विविध ऑफर्स दिल्या जात आहेत. या माध्यमातून तुम्ही नामवंत कंपन्यांचे स्मार्टफोन अतिशय कमी किंमतीत खरेदी करु शकणार आहात. पाहूयात कोणत्या मोबाईलवर कोणती ऑफर देण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ओप्पो

ओप्पो ए५७ फोनच्या ३२ जीबी व्हेरिएंटवर २५ टक्के डिस्काऊंट मिळत आहे. त्यामुळे हा फोन ११,९९० रुपयांत खरेदी करता येऊ शकतो. यासोबतच १,१९९ रुपयांची कॅशबॅक ऑफरही उपलब्ध आहे. कॅशबॅकनंतर या फोनची किंमत कमी होऊन १०.९७१ रुपये होणार आहे.

नोकिया

नोकियाचा स्मार्टफोन पेटीएम मॉलवर २१ टक्के डिस्काऊंटसह खरेदी करता येणार आहे. या व्यतिरिक्त ग्राहकांना १८ टक्क्यांपर्यंत कॅशबॅक सुद्धा मिळणार आहे. गेल्यावर्षी लाँच झालेला नोकियाचा प्लॅगशिप स्मार्टफोन नोकिया ८ पेटीएम मॉलवर २१ टक्क्यांच्या सूटसह ३१,५०० रुपयांत खरेदी करता येणार आहे. तसेच ५,६७० रुपयांचा कॅशबॅकही मिळत आहे. सर्व ऑफर्सनंतर फोनची किंमत २५,८३० रुपये होणार आहे.

Vivo

ओप्पो प्रमाणेच Vivo च्या फोनवरही ५ टक्क्यांची कॅशबॅक ऑफर उपलब्ध आहे. चीनी कंपनीच्या Vivo V5S स्मार्टफोनवर ३१ टक्के सूट मिळत आहे. तसेच ६५५ रुपयांचा कॅशबॅकही आहे. अशा प्रकारे हा फोन १२,४४४ रुपयांत खरेदी करता येणार आहे.

मोटोरोला

मोटोरोलाच्या फोनवर तब्बल ३५ टक्क्यांची सूट मिळत असून मोटो जी5एसचा ३२ जीबी व्हेरिएंटवर १७५८ रुपयांची कॅशबॅक ऑफर मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांना हा फोन ८,७०० रुपयांत खरेदी करता येईल. मोटो एक्स4 चा ६४ जीबी व्हेरिएंटवर अधिकाधिक कॅशबॅक ४,२६४ रुपये आहे. त्यामुळे हा हँडसेट १९,४२६ रुपयांत उपलब्ध आहे.

याबरोबरच सॅमसंग, लिनोवो, अॅप, ऑनर अशा कंपन्यांचे फोनही पेटीएम मॉलवरुन अतिशय स्वस्तात खरेदी करता येणार आहेत. या मोबाईलवरही ६ ते ९ हजार रुपयांची कॅशबॅक मिळू शकणार आहे.

 

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paytm offers cashback on various smartphones see full details
First published on: 14-06-2018 at 20:14 IST