News Flash

असा करा ख्रिसमस, न्यू इयर पार्टीसाठी हटके लूक

कॉकटेलचा लूक हा साधारणपणे आधुनिक असतो. त्यामुळे त्यावरील दागिने आकर्षक रंग आणि त्याची सजावट ड्रेसला शोभतील अशाच हव्या.

कॉकटेल पार्टीसाठीचा ड्रेस हा संध्याकाळच्या कार्यक्रमासाठीचा ड्रेस कोड आहे. महिलांसाठी, कॉकटेल पोशाख सामान्यत: गुडघे आणि टाचांच्या वर किंवा खाली असणारा ड्रेस आहे. कॉकटेलचा लूक हा साधारणपणे आधुनिक असतो. त्यामुळे त्यावरील दागिने आकर्षक रंग आणि त्याची सजावट ड्रेसला शोभतील अशाच हव्या. जाणून घेऊया अशाच काही महत्वाच्या कॉकटेल ड्रेसवर शोभून दिसणाऱ्या कॅरटलेन दागिन्यांबद्दल.

बटरफ्लाय ईयर रिंग्स :  पारंपरिक सोन्याचे ट्रेन्ड येऊ शकतात आणि पुन्हा जाऊही शकतात, वेगवेगळ्या रंगातील  बटरफ्लाय सारख्या ईअर रिंग ह्या कायम स्वरूपी राहणाऱ्या आहेत. कारण त्या मुळातच पारंपारिकते सोबत कॅज्युअल किंवा कॉकटेल पार्टी सारख्या इव्हेंटसाठी सुद्धा वापरता येतात. ह्या रिंग वेगवेगळ्या डिझाईन आणि रंगामध्ये उपलब्ध असल्याने कॉकटेल पार्टीचा विचार करता या बटरफ्लाय रिंग्स तुमच्या कोणत्याही रंगाच्या कॉकटेल ड्रेसवर शोभून दिसतील. त्याचे दोन पंख आणि त्यावर केलेले हिऱ्यांचे कोंदण त्यामुळे ते अधिक उठावदार दिसतात.

अंगठी :कॉकटेल पार्टी साठी अनेक प्रकारच्या रिंग आपण परिधान करू शकतो. त्यामध्ये स्पार्कलिंग मिरॅकल प्लेट रिंग, एंचन्ट प्लॅटिनम रिंग, प्रेशिअस  प्लॅटिनम रिंग एमिली हेलो रिंग यांचा प्रामुख्याने समावेश आहे. त्यांचा सोने, चांदी तसेच प्लॅटिनमचे मूळ स्ट्रक्चर बनवण्यासाठी उपयोग केला जातो आणि उर्वरित भाग हिऱ्यांच्या कोंदणाने सजवला जातो. रिंग मध्येही अनेक रंग उपलब्ध असतात, त्यामुळे ते तुमच्या ड्रेसप्रमाणे मॅच करता येऊ शकतात. यामधील लाल रंगाच्या रिंग्स ख्रिस्तमस पार्टीसाठी अगदी शोभून दिसणाऱ्या आहेत.

ब्रेसलेट: हे एक महत्वाचं आभूषण आहे कारण जर आपल्या ड्रेसला स्लीव्स पूर्ण असतील तर त्या ड्रेस आणि ब्रेसलेटचे रंगसंगती जुळून येणं गरजेचं असतं, नाहीतर कितीही महागडे कॉकटेल ड्रेस असेल आणि तुमचे ब्रेसलेट त्याला मॅच होत नसेल तर तुमच्या लूकला काहीच अर्थ नाही. कारण पार्टी मध्ये लोकांच्या नजरा तुम्ही चुकवू शकत नाही.

पेंडंट : कोणत्याही कार्यक्रमात पेंडेंट्स घालण्याची परंपरा जुन्या काळापासून आहे. आजकाल ते एक स्टाईलचा भाग बनली आहे. या स्टाईलसोबत वेगवेगळ्या कार्यक्रमांना वेगवेगळे पेंडंट घालण्याचा ट्रेंड रुजत आहे. पेंडंट हे प्रत्यक्ष दर्शनी दिसणारे आणि आपल्या सौंदर्याला खुलवणारा दागिना आहे. आपली स्किन टोन आणि ड्रेस यावर योग्य पेंडंट मॅच केल्यास आपले व्यक्तिमत्व खुलून येईल. हेज रॉयल डायमंड, कॅम्पान्शन सॉलिटेअर, हेलो डिस्क, सॅण्ड टेक्सचर्ड हार्ट,जो ट्रेलेस पेंडंट असे अनेक प्रकारचे पेंडंट आपल्याला कॉकटेल पार्टीसाठी आकर्षक बनवतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2018 3:46 pm

Web Title: perfect jewellery to pair with your christmas party cocktail dress
Next Stories
1 Oppo R17 Pro च्या विक्रीला सुरूवात, जाणून घ्या ऑफर्स
2 ‘जावा’ला तुफान प्रतिसाद, ऑनलाइन बुकिंग बंद
3 शाओमीने लाँच केला नवा POCO स्मार्टफोन, जाणून घ्या खासियत
Just Now!
X