27 January 2021

News Flash

‘स्वस्त’ Poco स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी, पाच कॅमेऱ्यांसह 5000mAh ची दमदार बॅटरी

किंमत 15 हजारांपेक्षा कमी

जुलै महिन्याच्या सुरूवातीला लाँच झालेला Poco M2 Pro हा लेटेस्ट स्मार्टफोन आज(दि.25) फ्लॅश-सेलमध्ये खरेदी करण्याची संधी आहे. नवीन Poco स्मार्टफोनमध्ये होल-पंच डिस्प्ले आणि क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप आहे. एकूण पाच कॅमेरे असलेल्या या स्मार्टफोनमध्ये प्रो कलर मोड, प्रो व्हिडिओ मोड आणि RAW मोड यांसारखे अनेक कॅमेरा मोड आधीपासून देण्यात आले आहेत. पोको एम2 प्रो, हा भारतात Poco ब्रँडअंतर्गत तिसरा फोन अशून आधीच्या दोन स्मार्टफोनच्या तुलनेत हा स्वस्त आहे. मार्केटमध्ये हा फोन तीन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. दुपारी 12 वाजेपासून Poco M2 Pro  या फोनसाठी फ्लिपकार्टच्या वेबसाइटवर फ्लॅश सेलला सुरूवात होईल. फोनच्या खरेदीवर सेलमध्ये काही आकर्षक ऑफरही आहे. ऑफरनुसार, फेडरल बँक डेबिट कार्डवर 10 टक्के इंस्टंट डिस्काउंट मिळेल. याशिवाय प्रति महिना 1,667 रुपयांपासून नो-कॉस्ट ईएमआयचा पर्यायही ग्राहकांना मिळेल.

Poco M2 Pro किंमत :-
पोको एम2 प्रोच्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 13,999 रुपये आहे. तर, 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 14,999 रुपये आहे. या स्मार्टफोनमधील सर्वात पॉवरफुल व्हेरिअंट म्हणजे 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 16,999 रुपये आहे. आउट ऑफ द ब्लू, ग्रीन अँड ग्रीनर आणि ट्रू शेड्स ऑफ ब्लॅक अशा तीन कलरमध्ये हा फोन लाँच करण्यात आला आहे.

Poco M2 Pro फीचर्स :-
ड्युअल सिम सपोर्ट असलेला Poco M2 Pro अँड्रॉइड 10 वर आधारित MIUI 11 for Poco वर कार्यरत आहे. यामध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शनसह 6.67 इंचाचा फुल-एचडी+ (1,080×2,400 पिक्सल) डिस्प्ले आहे. यात ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 720जी प्रोसेसरचा वापर करण्यात आला असून 6 जीबीपर्यंत LPDDR4X RAM आहे. पोको एम2 प्रोमध्ये चार रिअर कॅमेऱ्यांचा सेटअप आहे. यातील प्राइमरी कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे. तर, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड-अँगल लेंन्स, 5 मेगापिक्सलचा मॅक्रो शूटर आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. याशिवाय सेल्फीसाठी फोनमध्ये नाइट मोड सपोर्ट असलेला 16 मेगापिक्सल कॅमेरा आहे. 128 जीबी मेमरी असून माइक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 512 जीबीपर्यंत वाढवता येणं शक्य आहे. कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये 4जी व्हीओएलटीई, वाय-फाय 802.11एसी, ब्लूटूथ 5.0, जीपीएस/ ए-जीपीएस, यूएसबी टाइप-सी आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक आहे. फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली 5,000 एमएएच क्षमतेची दमदार बॅटरी असलेल्या या फोनच्या मागील बाजूला फिंगरप्रिंट सेन्सरही आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2020 11:40 am

Web Title: poco m2 pro to go on sale in india today via flipkart check price offers and specifications sas 89
Next Stories
1 …जाणून घ्या गौरी आवाहनाची परंपरा
2 ‘स्वस्त’ OnePlus Nord खरेदी करण्याची आज संधी, दुपारी 1 वाजेपासून ‘फ्लॅश-सेल’
3 Jio ने लाँच केले ‘क्रिकेट धन धना धन’ प्लॅन्स, ‘फ्री’मध्ये घेता येणार IPL ची मजा
Just Now!
X