News Flash

स्वस्तात Poco X3 PRO खरेदी करण्याची आज संधी, जाणून घ्या सविस्तर

स्नॅपड्रॅगन 860 प्रोसेसर, 5160mAh क्षमतेची दमदार बॅटरी आणि साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरसारखे शानदार फिचर्स

‘पोको इंडिया’ने मार्च महिन्याच्या अखेरीस आपला Poco X3 PRO हा स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केला. कंपनीने Poco X3 PRO स्मार्टफोनमध्ये दमदार पर्फॉर्मन्ससाठी स्नॅपड्रॅगन 860 प्रोसेसर दिलं आहे. शिवाय फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेला डिस्प्लेही आहे. Poco X3 PRO मध्ये 48 मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर असून 5160 mAh क्षमतेच्या दमदार बॅटरीसह 33W फास्ट चार्जिंगचा सपोर्टही आहे. आज (दि.१५) ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टच्या वेबसाइटवर हा शानदार स्मार्टफोन सेलमध्ये खरेदी करण्याची संधी आहे. दुपारी १२ वाजेपासून सेलला सुरूवात झाली असून सेलमध्ये फोनच्या खरेदीवर काही आकर्षक ऑफरही आहेत. आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे हा फोन खरेदी करणाऱ्यांना 1,000 रुपयांची सवलत मिळेल. शिवाय दरमहा 3,500 रुपये नो-कॉस्ट ईएमआयचा पर्यायही ग्राहकांसाठी आहे. या व्यतिरिक्तही काही खास ऑफरचा लाभ ग्राहकांना मिळू शकतो. जाणून घेऊया कसा आहे Poco X3 PRO :-

Poco X3 Pro स्पेसिफिकेशन्स
Poco X3 Pro मध्ये अँड्रॉइड 11 वर आधारित MIUI 12 चा सपोर्ट असून फोनमध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. डिस्प्लेवर गोरिल्ला ग्लास 6 प्रोटेक्शनही मिळेल. तसेच या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 860 प्रोसेसर, ग्राफिक्ससाठी Adreno 640 GPU, 8 जीबीपर्यंत LPDDR4X रॅम आणि 128 जीबीपर्यंत स्टोरेज आहे. फोटोग्राफीसाठी यात मागील बाजूला क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप आहे. यातील मुख्य कॅमेरा 48 मेगापिक्सेलचा आहे. तर, अन्य तीन कॅमेरे अनुक्रमे 8 मेगापिक्सेल (अल्ट्रा वाइड), 2 मेगापिक्सेल (मॅक्रो लेन्स) आणि 2 मेगापिक्सेल (डेफ्थ सेन्सर) आहेत. याशिवाय सेल्फीसाठी यात पुढील बाजूला 20 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेराही आहे.

Poco X3 Pro ची बॅटरी
कनेक्टिव्हिटीसाठी पोकोच्या या फोनमध्ये 4G LTE, Wi-Fi, ब्लूटूथ v5.0, GPS/A-GPS, USB टाईप-सी पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक आहे. फोनमध्ये ड्युअल स्पीकर असून फोनला वॉटर व डस्टप्रूफसाठी IP53 रेटिंग मिळाली आहे. Poco X3 Pro मध्ये कंपनीने साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर फिचरही दिलं आहे. या फोनमध्ये 5160mAh क्षमतेची दमदार बॅटरी असून ही बॅटरी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Poco X3 PRO किंमत :-
Poco X3 PRO हा फोन कंपनीने 6जीबी रॅम आणि 8जीबी रॅम अशा दोन प्रकारात आणला आहे. 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेल्या Poco X3 PRO ची किंमत 18 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर, 8जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 20 हजार 999 रुपये आहे. हा फोन गोल्डन ब्राँझ, ग्रेफाइट ब्लॅक आणि स्टील ब्लू अशा तीन रंगात खरेदी करता येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2021 1:01 pm

Web Title: poco x3 pro go on sale in india via flipkart check offers price and specifications sas 89
Next Stories
1 स्वस्त झाला ‘जंबो बॅटरी’चा दमदार Samsung Galaxy M21, जाणून घ्या नवीन किंमत आणि फिचर्स
2 नाही ‘लीक’ झाला Clubhouse च्या १३ लाख युजर्सचा ‘डेटा’, CEO म्हणाले हॅकिंगचा दावा ‘दिशाभूल करणारा’
3 Nokia चे नवीन वायरलेस ईअरबड्स लाँच, 36 तासांच्या बॅटरी लाइफचा कंपनीचा दावा
Just Now!
X