News Flash

पोलिओ उच्चाटनाचे प्रयत्न सर्वकष करण्याची गरज

जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकाऱ्यांनी नोंदवले मत

| January 17, 2016 11:56 am

२०११ मध्ये भारत संपूर्णपणे पोलिओमुक्त घोषित करण्यात आल्यानंतर सातत्याने काही काळाने पोलिओचा विषाणू कुठे आढळतो का, याची चाचणी केली जाते.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकाऱ्यांनी नोंदवले मत
आग्नेय आशियातील देशांनी पोलिओचे उच्चाटन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्याने या देशांमध्ये गेल्या पाच वर्षांत पोलिओच्या एकाही रुग्णाची नोंद झालेली नाही, तरीही या देशांनी पोलिओ निराकरण मोहीम सुरूच ठेवून या मोहिमेतील संसाधनांमध्ये आणखी सुधारणा करावी, असे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) म्हटले आहे. पोलिओ उच्चाटनाचे प्रयत्न र्सवकष करण्याची गरज असल्याचे डब्ल्यूएचओकडून सांगण्यात आले आहे.
आग्नेय आशियातील काही देशांमध्ये मात्र पोलिओचे समूळ उच्चाटन झालेले नाही. त्यामुळे पोलिओचा विकार इतर देशांत पसरण्याची शक्यता आहे, असे डब्ल्यूएचओच्या आग्नेय आशियाच्या अधिकारी पूनम सिंग यांनी सांगितले.
गेल्या दशकभरात पोलिओच्या एकाही रुग्णांची नोंद न होणे ही निश्चितच कौतुकास्पद कामगिरी आहे. आता जागतिक स्तरावरही पोलिओच्या संसर्गाचे प्रमाण हे अत्यंत नगण्य आहे, पण पोलिओच्या जंतूंच्या होणाऱ्या संसर्गामुळे मात्र पोलिओचे उच्चाटन झालेला प्रांत कायमस्वरूपी तसाच राहणे शक्य नसल्याचे सिंग यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर पोलिओमुक्त भागासाठी घेतलेल्या विविध निर्णय, योजना, कार्यक्रम यांच्या अंमलबजावणीमुळेच या रोगाचे समूळ उच्चाटन झाले आहे. या रोगाचे निदान आणि रुग्णांमध्ये सकारात्मक प्रसार झाला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
आशिया, आफ्रिका, दक्षिण अमेरिका या खंडातील काही देशांमध्ये अजूनही पोलिओचे उच्चाटन झालेले नाही. या देशांनी पोलिओ निर्मूलनासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. पोलिओ उच्चाटनासाठी कार्यक्रम आखलेल्या देशांचा त्यांनी अभ्यास करणे आवश्यक आहे. जेणेकरून पोलिओच्या समूळ उच्चाटनांच्या कार्यक्रमातील या धोरणांची अंमलबजावणी ही भविष्यात लोकांच्या आरोग्याविषयक अन्य गरजांची पूर्तता करण्यास उपयुक्त ठरेल, असे पूनम सिंग यांनी सांगितले. पोलिओमुक्त विश्व डोळय़ांसमोर असून आता आपण संपूर्ण विश्वाला या रोगापासून मुक्त करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
डब्ल्यूएचओने २०११ मध्ये भारतातील पश्चिम बंगालमध्ये पोलिओचा रुग्ण आढळल्याचे अहवालात नमूद केले होते. त्यानंतर २७ मार्च २०१४ रोजी हा भाग पोलिओमुक्त झाल्याचे प्रमाणपत्र दिले गेले.
पोलिओचे समूळ उच्चाटन या कार्यक्रमाअंतर्गत या प्रातांतील अनेक देशांनी पोलिओ लसीकरणाची मोहीम र्सवकष स्तरावर समन्वय, टप्प्याटप्प्याने आणि यथाक्रमाने राबविताना लहान मुलांना इनअ‍ॅक्टिवेटेड पोलिओ लसीकरण (आयपीव्ही)चे डोस देण्यात आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2016 1:29 am

Web Title: polio uproot effort need to increase
Next Stories
1 भारत-मालदीवमध्ये आरोग्य क्षेत्रातील करार
2 अ‍ॅसिडिटीची औषधे मूत्रपिंडाला बाधक
3 अन्नसंरक्षक रसायनांनी कर्करोग पेशी मारण्यात मदत
Just Now!
X