डॉ. रिंकी कपूर

गर्भधारणा हा प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील एक सुंदर क्षण असतो. या कालावधीत तिच्या शरीरात अनेक विशिष्ट प्रकारचे बदल होत असतात. गरोदरपणात तसेच गरोदरपणानंतर हार्मोन्समध्ये झालेल्या बदलामुळे त्वचा, केसांमध्ये तसेच स्वभावात बदल दिसून येतो. काही स्त्रियांना संपूर्ण गर्भधारणेदरम्यान त्यांच्या त्वचा किंवा केसांमध्ये कोणताही बदल जाणवत नाही. परंतु बहुतेक स्त्रियांना डोळ्याभोवती काळी वर्तुळे, पिग्मेंटेशन, ओठ फाटणे, त्वचेवर चट्टे पडणे, मुरुम उठणे, व्हेरीकोज व्हेन्स, अशुद्ध रक्तवाहिन्या फुगून झालेल्या गाठी, भेगा पडलेल्या टाचा, नख आणि केसांची वाढ खुंटणे अशा अनेक समस्या उद्भवतात. काही स्त्रियांना ओटीपोटात आणि मांडी तसेच त्याच्या आसपास त्वचेवर खाज सुटते किंवा लाल रंगाचे पुरळ उठू शकतात. त्यामुळे या दिवसात गरोदर स्त्रियांनी स्वत:ची विशेष काळजी घेतली आहे.

loksatta Health Special article, relationship between, skin disorders, diabetes
Health Special: त्वचाविकार आणि मधुमेह नेमका काय संबंध?
summer
सुसह्य उन्हाळा!
drinking warm water
तुम्ही दररोज आठ ग्लास गरम पाणी प्यायल्याने शरीरात कोणते बदल होतील? तज्ज्ञांनी सांगितले फायदे व तोटे
Matka Hygiene know the mistakes while drinking matka water or clay pot water
उन्हाळ्यात माठातील पाणी पिण्याआधी ‘या’ गोष्टींची घ्या काळजी; अन्यथा…

कशी घ्याल त्वचेची काळजी ?

१. घराबाहेर पडताना प्रत्येक वेळी सनस्क्रीनचा वापर करा. तसेच उन्हापासून संरक्षण करण्यासाठी छत्री तसेच टोपीचा वापर करावा. सुर्याच्या हानिकारक अतिनील किरणांपासून संरक्षण करणे आवश्यक आहे.

२. सॅलिसिलिक अॅसिड किंवा रेटिनोइड, आयसोट्रेटीनोईनआणि ओरल टेट्रासाइक्लिन असलेली उत्पादने वापरू नका. कारण यामुळे बाळामध्ये जन्मदोष उद्भवू शकतात.

३. मेकअप आणि त्वचेकरिता वापरली जाणारी उत्पादने सुंगंध विरहीत असणे गरजेचे आहे.

४. झोपाण्यापूर्वी दररोज न चुकता आपला मेकअप काढणे आवश्यक आहे.

५. त्वचेला मॉईश्चराईज करा.

६. दिवसातून दोनदा कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा.

७.जास्त जोरात आपली त्वचा घासू नका. अंग पुसण्यासाठी स्वच्छ आणि मुलायम कपडा वापरा.

८. चेहऱ्यावर मुरुम झाल्यास त्यावर उपचार करण्यासाठी ओटीसी उत्पादने वापरता येऊ शकतात. परंतु, त्यात टॉपिकल बेंझॉयल पेरोक्साईड, अझेलिक अॅसिड आणि ग्लाइकोलिक अॅसिड असल्याची खात्री करुन घ्या. तसंच कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

९.शक्य तितका आराम करा आणि ताण घेऊ नका.

(लेखिका डॉ.रिंकी कपूर या द एस्थेटिक क्लिनिक्स’च्या त्वचारोग सल्लागार आणि कॉस्मेटिक त्वचारोग तज्ज्ञ आहेत.)