Oppo A7 या स्मार्टफोनच्या किंमतीत भारतामध्ये कपात करण्यात आली आहे. हा स्मार्टफोन भारतात दोन व्हेरिअंट्समध्ये उपलब्ध आहे. Oppo A7 च्या 3GB आणि 4GB रॅम या दोन्ही व्हेरिअंट्सच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. किंमतीत झालेल्या कपातीनंतर Oppo A7 चा 3GB व्हेरिअंट 12 हजार 990 रुपये आणि 4GB व्हेरिअंट 14 हजार 990 रुपयांमध्ये उपलब्ध असेल.

हा स्मार्टफोन कंपनीने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात लाँच केला होता. लाँच करतेवेळी हा स्मार्टफोन केवळ 4GB रॅम व्हेरिअंटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होता. त्यानंतर जानेवारी महिन्यात कंपनीने या स्मार्टफोनसाठी 3GB व्हेरिअंट सादर केलं होतं. यानंतर मार्च महिन्यात सर्वप्रथम या स्मार्टफोनच्या किंमतीत कपात करण्यात आली होती, त्यानंतर आता पुन्हा या स्मार्टफोनच्या किंमतीत घट झाली आहे. या स्मार्टफोनमध्ये वॉटरड्रॉप नॉच, ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आणि 4,230mAh बॅटरी देण्यात आली आहे.

ओप्पो ए७ ची वैशिष्ट्ये –
अॅड्रॉइड ८.१ ओरिओ बेस्ड कलर ओस ५.२ प्रणाली
४२३० मेगावॅटची बॅटरी
ड्युअल सिम सपोर्ट
फोटोग्राफीसाठी ड्युअल रिअर कॅमेरा
एलईडी फ्लॅशसह १३ मेगापिक्सल प्रायमरी व र मेगापिक्सल सेकंडरी डेप्थ सेंसर
सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी १६ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
कनेक्टिविटीसाठी ब्लूटूथ ४.२, जीपीएस, वायफाय
३.५ एमएम ऑडिओ जॅक
मायक्रो युएसबी पोर्ट
मागील बाजूस फिंगरप्रिंट सेंसर