01 April 2020

News Flash

पत्नीच्या आठवणीसाठी त्याने मुलीसोबत केले अनोखे फोटोसेशन!

एखादी प्रिय व्यक्ती आपल्याला अचानक सोडून जाणे ही निश्चितच दुख:द आणि हादरवून टाकणारी गोष्ट असते. त्या व्यक्तीची आठवण जगणे नकोशी करणारी असली तरी कधीकधी याच

एखादी प्रिय व्यक्ती आपल्याला अचानक सोडून जाणे ही निश्चितच दुख:द आणि हादरवून टाकणारी गोष्ट असते. त्या व्यक्तीची आठवण जगणे नकोशी करणारी असली तरी कधीकधी याच विरहाच्या भावनेतून काहीतरी चांगले आकाराला येऊ शकते. राफेल डेल कोलच्याबाबतीतही काहीसे असेच घडले. २०१३ मध्ये झालेल्या अपघातात राफेलची पत्नी तातिआनाचा मृत्यू झाला होता. त्यावेळी राफेल आणि तातिआना यांना रासिया नावाची चिमुकली मुलगी होती. त्यानंतर राफेलला अनेकदा तातिआनाची आठवण येत असे. साधारण वर्षभरापूर्वी राफेलला सतविणाऱ्या याच विरहाच्या भावनेतून छायाचित्रांच्या एका अप्रतिम कलाकृतीला जन्म दिला. राफेल आणि तातिआना यांनी २००९मध्ये विवाहबद्ध होण्यापूर्वी एक फोटोसेशन केले होते. याच फोटोसेशनवरून राफेलला एक अनोखी कल्पना सुचली. त्याने आपल्या लाडक्या पत्नीला भावनिक श्रद्धांजली वाहण्यासाठी स्वत:ची लहान मुलगी रासियाबरोबर अगदी तसेच फोटोशुट करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये रासियाचा कपडे, मेकअप, वेशभुषा सगळे काही तातियानाशी मिळतेजुळते आहे. त्यामुळे हे फोटोसेशन एकप्रकारे राफेल आणि तातिआनाने एकत्र घालवलेले क्षण जिवंत करणारे ठरले आहे. ब्राझीलमधील रईझ फोटोग्राफिआ यांच्याकडून काढण्यात आलेली छायाचित्रे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरलही झाली आहेत.

wife1 wife6

wife3


wife2

wife4

wife5

041

09

011
031

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2015 1:30 am

Web Title: rafael del col recarating wife memories through photoshoot
टॅग Lifestyle
Next Stories
1 तुळशीच्या वैद्यकीय गुणधर्माचा शोध
2 हवामान बदलाचा परिणाम हृदयविकार रुग्णांवरही
3 कोरड्या त्वचेसाठी दूध आणि हळद उपयोगी
Just Now!
X