वायरलेस संगणकीय उपकरणांची निर्मिती करणाऱ्या ‘रॅपो’ने ‘९३०० एम मल्टीमोड वायरलेस कीबोर्ड आणि ऑप्टिकल माऊस’ ही संयुक्त उत्पादने बाजारात आणली आहे. या कीबोर्डचे वैशिष्टय़ म्हणजे तो एकाच वेळी चार उपकरणांना जोडता येऊ शकतो. तर माऊस तीन उपकरणांना एकाचवेळी जोडता येतो.
याद्वारे, एकाच कीबोर्ड व माऊसच्या सहाय्याने तुम्ही वेगवेगळ्या संगणकांना किंवा लॅपटॉपला हाताळता येणार आहे. कीबोर्डमध्ये ‘३ए’ आकाराच्या दोन बॅटऱ्या बसवल्यावर तो एक वर्षभर कार्यरत असतो व माउससाठी एका ‘३ए’ आकाराच्या बॅटरीची गरज असते, असा कंपनीचा दावा आहे. कीबोर्डच्या बांधणीचे वैशिष्टय़ म्हणजे तो अॅल्युमिनियमचा वापर करून बनवण्यात आला असून तो जेमतेम पाच मिमी इतक्या जाडीचा आहे. त्यामुळे अतिशय कमी जागेतही तो ठेवता येतो. ही दोन्ही उत्पादने ब्लूटुथ ३.० व ४.० वर काम करतात. ही उपकरणं अग्रगण्य रिटेल स्टोअर्स आणि ई-कॉमर्स संकेतस्थळांवर विक्रीसाठी उपलब्ध आहे.
किंमत : ३४९९ रुपये