News Flash

लोकसंख्या नियंत्रणासाठी आरसीपी लस उपयुक्त

लस लोकसंख्येच्या या भस्मासुराला अटकाव करण्यासाठी उपयुक्त असल्याचे संशोधनात म्हटले आहे.

| February 26, 2016 01:47 am

आंतरराष्ट्रीय परिषदेत तज्ज्ञांचे मत
जागतिक पातळीवर झपाटय़ाने वाढणारी लोकसंख्याच पर्यावरणाच्या प्रदूषणाला कारणीभूत असून रिबोफेलेविन कॅरियर प्रोटिनची (आरसीपी)लस लोकसंख्येच्या या भस्मासुराला अटकाव करण्यासाठी उपयुक्त असल्याचे संशोधनात म्हटले आहे.
‘पर्यावरणाला घातक आणि पर्यावरणीय विज्ञान’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेदरम्यान आरसीपीवर आधारित संशोधनावर चर्चा करताना राजस्थानमधील प्राध्यापक मुकेश कुमार यांनी लसीकरणाच्या माध्यमातून महिला आणि पुरुषांचे संभाव्य जन्म नियंत्रण केले जाऊ शकते, असे म्हटले आहे.
या परिषदेत प्राध्यापक मुकेश यांनी मांडलेल्या मतानुसार, आरसीपीवर आधारित लसीकरण ही अतिशय प्रगतशील सुधारणा असून गर्भनिरोधक वापरणाऱ्यांसाठी एक अतिरिक्त पर्याय आहे. (सध्या कोणतीही गर्भनिरोधक लस उपलब्ध नाही.) ही पद्धत अस्तित्वात असलेल्या जन्म नियंत्रण पद्धतीपेक्षा कितीतरी पटीने उपयुक्त पद्धत आहे. या संशोधनानुसार जगभरात वेगाने वाढणारी लोकसंख्येवरील नियंत्रणातूनच पर्यावरणावरील प्रदूषणाला आळा घालणे शक्य होऊ शकते. त्याचबरोबर जन्म नियंत्रण तंत्रज्ञानानेच यापूर्वीही आणि सध्यस्थितीला देखील कुटूंब नियोजनाच्या आणि जगभरातील लोकसंख्येला मर्यादित ठेवण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे.
मध्यवर्ती संस्था मत्स्यव्यवसाय तंत्रज्ञान (सीआयएफटी)च्या वतीने आयोजित ‘पर्यावरणाला घातक आणि पर्यावरणीय विज्ञान’ या विषयावरील तीनदिवसीय परिषदेला परदेशी आणि भारतातील दीडशे शास्त्रज्ञांसोबतच विविध संशोधनाचे विद्वान आणि पद्धवीत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थाचा सहभाग आहे. या परिषदेला युनेस्कोशी सलंग्न असलेल्या जागतिक स्थरावरील विशेष प्रशिक्षण संस्थेने प्रायोजक्त केले असून परिणाम, शोध, मापन आणि मोठय़ा प्रमाणात विषारी पदार्थावर नियंत्रण या विषयावरील चर्चेला प्राथमिकता देण्यात आली आहे. त्याचबरोबर पर्यावरणशास्त्र, मानवी आरोग्य, पाण्यातील प्रदूषणातून पर्यावरणात पसरणाऱ्या विषारी घटकांचे संभाव्य दुष्परिणाम आणि मानवावर होणारा आघात या मुद्दय़ांवरही चर्चा केली जाणार आहे.
(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2016 1:47 am

Web Title: rcp vaccine helpful for population control
Next Stories
1 गल्यानं साखली सोन्याची…
2 गाजर हलवा
3 तिळगूळ पोळी
Just Now!
X