05 March 2021

News Flash

मागील बाजूला चार कॅमेरे ; Realme 5 Pro चा भारतात पहिलाच ‘सेल’

Realme 5 Pro आज पहिल्यांदाच विक्रीसाठी उपलब्ध

Realme कंपनीने गेल्या महिन्यात मागील बाजूला चार कॅमेरे असलेले Realme 5 Pro आणि Realme 5  हे दोन स्मार्टफोन लाँच केले होते. यातील Realme 5 Pro हा स्मार्टफोन आज पहिल्यांदाच विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. या स्मार्टफोनसाठी पहिल्यांदाच सेलचं आयोजन करण्यात आलं असून फ्लिपकार्ट आणि Realme.com या संकेतस्थळांवर दुपारी 12 वाजेपासून हा सेल सुरू होईल. सेलमध्ये काही खास आकर्षक ऑफर्स देखील आहेत.

लाँच ऑफर अंतर्गत हा फोन ‘रिअलमी’च्या अधिकृत संकेतस्थळावरुन खरेदी करणाऱ्या रिलायंस जिओच्या ग्राहकांना सात हजार रुपयांपर्यंत विविध प्रकारचा फायदा मिळेल. पेटीएमद्वारे फोन खरेदी केल्यास दोन हजार रुपयांपर्यंत कॅशबॅकची ऑफर देखील आहे. याशिवाय फ्लिपकार्टच्या संकेतस्थळावर नो-कॉस्ट इएमआयचा पर्यायही आहे.

Realme 5 Pro किंमत –
Realme 5 Pro या स्मार्टफोनची किंमत 13 हजार 999 रुपयांपासून सुरू होते. ही किंमत 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिअंटची आहे. Realme 5 Pro च्या 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 14 हजार 999 रुपये आहे. तर, 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजच्या व्हेरिअंटची किंमत 16 हजार 999 रुपये आहे.

Realme 5 Pro चे फीचर्स –
या स्मार्टफोनमध्ये 6.3 इंच FHD+ ड्यूड्रॉप फुल स्क्रीन आहे. मागील बाजूला चार कॅमेरे असून त्यातील एक 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. याशिवाय एक कॅमेरा 8 मेगापिक्सल आणि अन्य दोन कॅमेरे 2 मेगापिक्सलचे आहेत. सेल्फीसाठी पुढील बाजूला 16 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 712 प्रोसेसर आहे. Realme 5 Pro स्पार्कलिंग ब्ल्यू, क्रिस्टल ग्रीन अशा दोन रंगांमध्ये उपलब्ध असेल. या स्मार्टफोनमध्ये 4,035 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. या फोनच्या विक्रीसाठी 4 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजेपासून फ्लिपकार्टच्या संकेतस्थळावर सेल आयोजित करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2019 10:02 am

Web Title: realme 5 pro goes on sale for first time in india know price features and all offers sas 89
Next Stories
1 सिंगल तरुणाईची ‘लव्ह एक्स्प्रेस’, काही तासांत पूर्ण होतो ‘लाइफ पार्टनर’चा शोध
2 डोळ्यात कचरा गेल्यावर करा ‘हे’ उपाय
3 पावसाळ्यात पाणी पिताना अशी घ्या काळजी…
Just Now!
X