01 October 2020

News Flash

सहा कॅमेऱ्यांचा Realme 6 Pro आला नवीन व्हेरिअंटमध्ये, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

64MP कॅमेऱ्यासह पॉवरफुल क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 720G प्रोसेसर...

रिअलमी कंपनीने भारतात आपला Realme 6 Pro स्मार्टफोन नवीन ‘लाइट्निंग रेड’ (Lightning Red) कलर ऑप्शनमध्ये लाँच केला आहे. नवीन कलर व्हेरिअंटमधील Realme 6 Pro फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. 6 ऑगस्ट म्हणजे आजपासून सुरू झालेल्या फ्लिपकार्ट Big Saving Days सेलमध्ये हा फोन खरेद करता येईल. या सेलमध्ये स्मार्टफोन्सच्या खरेदीवर अनेक आकर्षक ऑफरही आहेत. नवीन कलर मॉडेलमध्ये ग्रेडिअंट फिनिश बॅक पॅनल आहे. मार्च महिन्यात कंपनीने हा फोन ‘लाइट्निंग ऑरेंज’ आणि ‘लाइट्निंग ब्लू’ कलरमध्ये लाँच केला होता. या फोनमध्ये सेल्फीसाठी ड्युअल फ्रंट कॅमेरा आणि मागे क्वॉड रिअर कॅमेरा अर्थात चार कॅमेऱ्यांचा सेटअप असे एकूण सहा कॅमेरे आहेत.

फीचर्स :-
क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 720G प्रोसेसर असलेल्या Realme 6 Pro स्मार्टफोनमध्ये 6.6 इंच ड्युअल पंच-होल डिस्प्ले आहे. सेल्फीसाठी यामध्ये ड्युअल फ्रंट कॅमेरा देण्यात आला असून यातील मुख्य कॅमेरा 16MP आणि दुसरा कॅमेरा 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आहे. याशिवाय कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्टेड असलेल्या Realme 6 Pro च्या मागील बाजूला चार कॅमेरे आहेत. यातील मुख्य कॅमेरा 64 मेगापिक्सलचा, 12 मेगापिक्सल टेलीफोटो लेन्स, 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड लेन्स आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो लेन्स आहे. Realme 6 Pro मध्ये सुपर लाइनर स्पीकर असून हा फोन ISRO च्या NAVIC सॅटेलाइट सिस्टिमला सपोर्ट करतो. याशिवाय Realme 6 Pro मध्ये 4,300 mAh क्षमतेची बॅटरी आणि 30W फ्लॅश चार्जर देण्यात आलं आहे. हा फोन तासाभरात पूर्ण चार्ज होतो असा कंपनीचा दावा आहे.

किंमत :-
Realme 6 Pro स्मार्टफोनच्या 6GB + 64GB स्टोरेज मॉडेलची किंमत 17 हजार 999 रुपये, 6GB + 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 18,999 रुपये आणि 8GB + 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 19,999 रुपये आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2020 11:43 am

Web Title: realme 6 pro lightning red colour option launched to go on sale during flipkart big saving days check price and offers sas 89
Next Stories
1 48MP कॅमेऱ्यासह 5000mAh ची दमदार बॅटरी, 15 हजारांपेक्षा कमी किंमतीतील स्मार्टफोनचा ‘सेल’
2 अनेक स्मार्टफोन्सवर भरघोस डिस्काउंट, फ्लिपकार्टवर Big Saving Days Sale झाला सुरू
3 ‘स्वस्त’ OnePlus Nord साठी अखेर आज ‘ओपन सेल’, जाणून घ्या ऑफर्स
Just Now!
X