News Flash

Realme च्या लेटेस्ट X3 सीरिजचा भारतातील पहिला ‘सेल’, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

रिअलमीने गेल्या आठवड्यात भारतात नवीन X3 सीरिज लाँच केली...

स्मार्टफोन कंपनी रिअलमीने गेल्या आठवड्यात भारतात नवीन X3 सीरिज लाँच केली. या सीरिजमध्ये दोन स्मार्टफोन कंपनीने लाँच केले असून दोन्ही स्मार्टफोन्समध्ये दमदार फीचर्स दिले आहेत. कंपनीने Realme X3 आणि Realme X3 SuperZoom हे दोन स्मार्टफोन भारतीय बाजारात उतरवले आहेत. या दोन्ही स्मार्टफोनच्या विक्रीसाठी आज(दि.30) भारतात पहिल्या सेलचं आयोजन करण्यात आलं आहे. दुपारी 12 वाजेपासून फ्लिपकार्ट आणि रिअलमीच्या अधिकृत वेबसाइटवर सेलला सुरूवात होईल.

Realme X3 आणि X3 SuperZoom किंमत :-
Realme X3 SuperZoom हा स्मार्टफोन कंपनीने दोन मॉडेल्समध्ये लाँच केलाय. यातील एका मॉडेलमध्ये तब्बल 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. या व्हेरिअंटची किंमत 32,999 रुपये आहे. तर, 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 27,999 रुपये आहे. Realme X3 हा स्मार्टफोनही कंपनीने दोन व्हेरिअंटमध्ये आणला आहे. या फोनच्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 25,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर, 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 24,999 रुपये आहे. हे दोन्ही फोन ग्लेशियर ब्लू, आर्क्टिक व्हाइट अशा दोन कलर्सच्या पर्यायांमध्ये लाँच करण्यात आले आहेत.

Realme X3 आणि X3 SuperZoom  स्पेसिफिकेशन्स :-
X3 SuperZoom या फोनमध्ये 6.6 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले आहे. या डिव्हाइसमध्ये पॉवरफुल क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 855+ चिपसेट असून तब्बल 12 जीबीपर्यंत रॅम आणि 256 जीबीपर्यंत इंटरनल स्टोरेज आहे. फोनमध्ये फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4,200mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरही आहे. या फोनचं खास फीचर म्हणजे या फोनच्या कॅमेऱ्यात असलेला 60x झूम. क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप असलेल्या या फोनमध्ये 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सल पेरिस्कोप लेन्स, 8 मेगापिक्सल (105 डिग्री) अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आहे. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32+8 मेगापिक्सलचा ड्युअल फ्रंट कॅमेरा मिळेल. नाइटस्केप 4.0 आणि Starry Mode या फोनमध्ये आहे, याद्वारे रात्रीही आकाशाचे फोटो काढता येतात. दुसरीकडे Realme X3 फोनमधील जवळपास सर्व फीचर्स SuperZoom मॉडेल्सलप्रमाणेच आहेत. पण कॅमेरा सेटअपमध्ये फरक आहे. या फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सल+8 मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. याशिवाय रिअर पॅनलवर क्वॉड कॅमेरा सेटअप आहे पण यात पेरीस्कोप सेन्सर देण्यात आलेला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 30, 2020 11:27 am

Web Title: realme x3 realme x3 superzoom to go on first sale today via flipkart get price specifications and other details sas 89
Next Stories
1 Ban झालेल्या टिकटॉकला पर्याय, ‘या’ भारतीय App ची ‘डिमांड’ वाढली
2 Realme च्या ‘बजेट’ स्मार्टफोनचा ‘सेल’, जाणून घ्या ऑफर्स
3 तुम्हाला माहित आहे का आषाढी एकादशीचे महत्त्व
Just Now!
X