बीएमसीचं अधेरी येथे असणाऱ्या सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये ५५० पदांची भरती निघाली आहे. करोनाशी दोन हात करण्यासाठी ही भरती निघाली असून तीन महिन्याच्या कंत्राटी पद्धतीनं भरतीपक्रीय पार पडणार आहे. १४ एप्रिल रोजी भरतीपक्रीयेला सुरूवात झाली आहे. क्वारंटाईन/आयसोलेशन केंद्र मरोळ, अंधेरी येथे ”कोव्हिड . 19“ बाधित रुग्णांकरीता असलेल्या विभागांमध्ये वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार, सहायक वैद्यकीय आधिकारी, अधिपरिचारिका यांची फक्त तीन महिन्यांकरीता कंत्राटी पध्दतीने भरती.
1) प्रशिक्षित अधिपरिचारिका (क्वालिफाईड स्टाफ नर्स)-400 पदे एकत्रित मानधन रु. 30,000/. दरमहा
पात्रता:- 12 वी उत्तीर्ण आणि जीएनएम डिप्लोमा (नर्सिंग कौन्सिल कडे रजिस्ट्रेषन आवष्यक)
2) सहायक वैद्यकीय अधिकारी-120 पदे
अ) एम.बी.बी.एस. – 60 पदे एकत्रित मानधन रु. 80,000/. दरमहा.
ब) बी.ए.एम.एस. – 30 पदे. एकत्रित मानधन रु. 60,000/. दरमहा
क) बी.एच.एम.एस. – 30 पदे एकत्रित मानधन रु. 50,000/. दरमहा.
पात्रता:- संबंधित शाखेतील पदवी (एमएमसी किंवा एमसीआय कडे रजिस्ट्रेशन आवष्यक.)
3) वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार-30 पदे एकत्रित मानधन रु. 3.5 लाख दरमहा
अ) इन्टेसिव्हिस्ट (एमडी – मेडिसिन)- 15 पदे
ब) अनेस्थटिस्ट (एमडी)- 10पदे क) नेफ्रॉलॉजिस्ट (डीएम)-3 पदे
ड) कार्डिओलॉजिस्ट (डीएम)-1 पद) इ) न्यूरोलॉजिस्ट (डीएम)-1 पद.
पात्रता:-उमेदवार संबंधित विषयातील डीग्री किंवा सुपरस्पेषालिटि डीग्री होल्डर असावा. (उमेदवार एमएमसी किंवा एमसीआय कडे रजिस्टर असावा)
वयोमर्यादाः- (दि.19 एप्रिल 2020 रोजी) 18 ते 33 वर्षे (अर्जासोबत जन्माचा दाखला/तत्सम प्रमाणपत्र सादर करावे)
(उमेदवाराने पदवी/पदविका परीक्षा एकापेक्षा जास्त प्रयत्नांत उत्तीर्ण केली असल्यास ती परीक्षा किती प्रयत्नांत उत्तीर्ण केली याचे प्रमाणपत्र सादर कराणे आवष्यक आहे.)
मुलाखतीचे स्थळ – अधिष्ठता कार्यालय, लोकमान्य टिळक रुग्णालय, शीव , मुंबई-22
मुलाखती दि.20 एप्रिल 2020 रोजी सकाळी 10.00 ते 5.00 वाजेपर्यंत घेतल्या जातील. अर्जासोबत उमेदवारांनी शैक्षणिक अर्हतेच्या छायांकित प्रती व अलिकडेच काढलेले पासपोर्ट आकाराचे छायाचित्र त्यावर चिटकवून आणि जन्मतारखेचा दाखला/तत्सम प्रमाणपत्र सादर करावे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 17, 2020 11:16 am