शाओमी कंपनीचा बजेट स्मार्टफोन Redmi 9 Prime चा आज दुपारी १२ वाजता सेल आहे. हा स्मार्टफोन भारतात ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लाँच झाला होता. रेडमीच्या या फोनमध्ये 128 जीबीपर्यंत इनबिल्ट स्टोरेज आणि 6.53 इंच फुल एचडी+ डिस्प्ले आहे. रेडमी 9 प्राइमच्या 4 जीबी रॅम व 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 9,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर, 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 11,999 रुपये आहे.

ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉन आणि Mi.com या दोन वेबसाइटवर आज (दि. २ ऑक्टोबर) Redmi 9 Prime साठी सेलचं आयोजन करण्यात आलं आहे. दुपारी 12 वाजेपासून हा फोन खरेदी करता येईल. सेलमध्ये फोनच्या खरेदीवर काही ऑफरही देण्यात आल्या आहेत. फोनच्या खरेदीवर ग्राहकांना नो-कॉस्ट ईएमआयचा पर्यायही आहे. कंपनी रेडमी 9 प्राइमसोबत बॉक्समध्ये एक कव्हर आणि स्क्रीन प्रोटेक्टर मोफत देत आहे. रेडमी 9 प्राइम हा फोन स्पेस ब्लू, मिंट ग्रीन, सनराइज फ्लेयर आणि मॅट ब्लॅक अशा चार कलरच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

Redmi 9 Prime: स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स:-
अँड्रॉइड 10 वर आधारित MIUI 11 ऑपरेटिंग सिस्टिमवर हा फोन कार्यरत आहे. रेडमी 9 प्राइममध्ये कंपनीने 6.53 फुल एचडी+ डिस्प्ले दिला आहे. तर, सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास आहे. फोनमध्ये 2.0 गीगाहर्ट्ज़ ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो G80 प्रोसेसर देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी ARM माली-G52 जीपीयू आहे. या प्रोससरमुळे गेमिंगचा चांगला अनुभव मिळतो असा कंपनीचा दावा आहे. याशिवाय हँडसेटमध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी व 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे. स्टोरेज माइक्रोएसडी कार्डद्वारे वाढवता येणं शक्य आहे, या फोनमध्ये ड्युअल सिम आणि एक माइक्रोएसडी कार्ड स्लॉट मिळेल. रेडमी 9 प्राइममध्ये क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप आहे. यात 13 मेगापिक्सलचा AI प्राइमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड अँगल, 5 मेगापिक्सल मॅक्रो आणि 2 मेगापिक्सल डेप्थ कॅमेरा आहे. कॅमेऱ्यात AI सीन डिटेक्शन फीचर मिळेल. तर, सेल्फीसाठी या स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सलचा AI फ्रंट कॅमेरा आहे. तसेच फास्ट चार्जिंग सपोर्टसह फोनमध्ये 5020mAh क्षमतेची बॅटरी आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 3.5 एमएम ऑडिओ जॅक, वायरलेस एफएम रेडिओ, आयआर ब्लास्टर, ब्लूटूथ 5.0 यांसारखे फीचर्स आहेत.