जर तुम्ही शाओमीचा बजेट स्मार्टफोन Redmi 9A खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आता हा फोन खरेदी करणं तुम्हाला थोडं महाग पडणार आहे. फेस्टिव सेल संपताच शाओमीने आपल्या Redmi 9A स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ केली आहे.

Redmi 9A नवीन किंमत :-
शाओमी कंपनीने सप्टेंबरमध्ये Redmi 9A हा बजेट स्मार्टफोन 6,799 रुपयांमध्ये लाँच केला होता. पण, आता कंपनीने या फोनच्या किंमतीत 200 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे आता हा फोन खरेदी करण्यासाठी तुम्हाला 6,999 रुपये मोजावे लागतील. मात्र, 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमतीत (7,499 रुपये) वाढ झालेली नाही. फोनच्या केवळ बेसिक व्हेरिअंटच्या किंमतीत (2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज) बदल झाला आहे.

आणखी वाचा- Moto G 5G : भारतातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन झाला लाँच, किंमत OnePlus Nord पेक्षाही कमी

Redmi 9A स्पेसिफिकेशन्स :-
Redmi 9A हा फोन अँड्रॉइड 10 वर आधारित MIUI 11 वर कार्यरत आहे. याशिवाय फोनमध्ये 6.53 इंचाचा IPS HD+ डिस्प्ले असून वॉटरड्रॉप डिझाइन आहे. फोनमध्ये मीडियाटेक ऑक्टाकोर हीलियो G25 प्रोसेसर दिलं आहे. हा फोन 2/3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेजच्या पर्यायात उपलब्ध असेल. फोटोग्राफीसाठी कंपनीने फोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे. तर, सेल्फीसाठी 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. रिअर कॅमेऱ्यासोबत फ्लॅश लाइट देखील आहे. Redmi 9A मध्ये कंपनीने फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली 5000mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे. ही बॅटरी दोन दिवसांपर्यंत बॅकअप देते असा दावा कंपनीने केला आहे. हा फोन नेचर ग्रीन, सी ब्लू आणि मिडनाइट ब्लॅक अशा तीन रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करता येईल.