01 March 2021

News Flash

Redmi K20-K20 Proचा फ्लॅशसेल, ‘या’ आहेत ऑफर्स

पहिल्या सेलमध्ये काही मिनिटांमध्येच हे दोन्ही फोन आउट ऑफ स्टॉक झाले होते

Xiaomi ची सब ब्रँड कंपनी Redmi ने भारतात Redmi K20 आणि K20 Pro हे दोन स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी लाँच केले होते. आज(दि.29) या दोन्ही स्मार्टफोनसाठी दुसऱ्यांदा फ्लॅश सेलचं आयोजन करण्यात आलं आहे. पहिल्या सेलमध्ये काही मिनिटांमध्येच हे दोन्ही फोन आउट ऑफ स्टॉक झाले होते. फ्लिपकार्ट आणि mi.com या संकेतस्थळावर दुपारी 12 वाजेपासून सेलला सुरूवात होणार आहे. या दोन्ही फोनच्या खरेदीवर कंपनीकडून विशेष सवलत दिली जाणार असून आकर्षक लाँच ऑफर देखील आहे.

शाओमीने भारतात के 20 स्मार्टफोनची किंमत 21 हजार 999 रुपये आणि के 20 प्रो स्मार्टफोनची किंमत 27 हजार 999 रुपये ठेवली आहे. या दोन्ही फोनच्या खरेदीवर एअरटेल कंपनीकडून डबल डेटा मिळेल. यासाठी युजर्सना 249 किंवा 299 रुपयांचं रिचार्ज करावं लागेल. तसंच एअरटेलच्या ग्राहकांना एअरटेल थँक्स गोल्डचे देखील फायदे मिळतील. याशिवाय ICICI बँकेच्या क्रेडिट अथा डेबिट कार्डने खरेदी केल्यास या फोनवर 1 हजार रुपयांची सूट मिळेल.

रेडमी K20 के स्पेसिफिकेशन्स –
6.39 इंच AMOLED डिस्प्ले,
स्क्रीन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर
क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 730 एसओसी प्रोसेसर
128जीबी इंटरनल स्टोरेज
6जीबी रॅम
अँड्रॉइड 9 पाय(MIUI 10)
फोटोग्राफीसाठी मागील बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप. यातील पहिला कॅमेरा 48 मेगापिक्सलचा, दुसरा कॅमेरा 13 मेगापिक्सलचा आहे आणि तिसरा कॅमेरा 8 मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओसाठी 20 मेगापिक्सलचा पॉप अप सेल्फी कॅमेराही देण्यात आला आहे. फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह 4000mAh बॅटरी क्षमता.

रेडमी K20 प्रो स्पेसिफिकेशन्स –
6.38 इंच फुल एचडी+ AMOLED डिस्प्ले,
स्नॅपड्रॅगन 855 एसओसी प्रोसेसर,
8जीबी रॅम,
256जीबी इंटरनल स्टोरेज,
MIUI 10 ऑपरेटिंग सिस्टिम
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये मागील बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप. यातील पहिला Sony IMX586 सेंसरसह 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, दुसरा कॅमेरा 13 मेगापिक्सलचा आहे आणि तिसरा कॅमेरा 8 मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओसाठी 20 मेगापिक्सलचा पॉप अप सेल्फी कॅमेराही देण्यात आला आहे. फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह 4000mAh बॅटरी क्षमता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2019 10:46 am

Web Title: redmi k20 and k20 pro goes on sale know all offers price and specifications sas 89
Next Stories
1 कर्कपेशी अचूक ओळखण्यासाठी प्रतिदीप्तता तंत्र
2 Oppo A7 च्या किंमतीत कपात, ‘ही’ आहे नवी किंमत
3 ‘ई-सिगारेट नि:संशय हानीकारक’
Just Now!
X