24 January 2021

News Flash

2000 रुपयांनी स्वस्त झाला Xiaomi चा फोन, फक्त पाच दिवसांसाठी ऑफर

पाच दिवसांसाठी शाओमीने आणली स्पेशल ऑफर...

रेडमी K20 Pro स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर चांगली संधी आहे.कारण कंपनीने काही दिवसांसाठी या पोनच्या किंमतीत कपात केली आहे. फोनच्या किंमतीत कंपनीकडून पाच दिवसांसाठी 2000 रुपयांची कपात करण्यात आली आहे. ही कपात फोनच्या 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज मॉडेलसाठी आहे.

शाओमी इंडियाचे प्रमुख मनू कुमार जैन यांनी याबाबत ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार १३ जुलैपर्यंतच म्हणजे आजपासून केवळ पाच दिवसांसाठी ही ऑफर असणार आहे. नवीन किंमती अॅमेझॉन इंडिया, फ्लिपकार्ट आणि Mi.com वर अपडेट करण्यात झाल्या आहेत.


किंमतीत झालेल्या कपातीमुळे 26,999 रुपयांचा Redmi K20 Pro 6जीबी रॅम व्हेरिअंट 24,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. तर , फोनच्या 8जीबी रॅम मॉडेलची किंमत सध्या 29,999 रुपये आहे. रेडमी के20 प्रो स्मार्टफोनमध्ये 6.39 इंचाचा Amoled फुल HD+ डिस्प्ले असून ऑक्टाकोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर, 8 जीबीपर्यंत रॅम आणि 256 जीबीपर्यंत स्टोरेज मिळेल. फोनमध्ये फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह 4,000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असून यातील 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे. तर, 13 मेगापिक्सल आणि 8 मेगापिक्सलचे अन्य दोन कॅमेरे आहेत. याशिवाय सेल्फीसाठी फोनमध्ये 20 मेगापिक्सलचा कॅमेराही देण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 9, 2020 2:21 pm

Web Title: redmi k20 pro 6 gb ram variant gets a temporary price drop of rs 2000 till 13 july now priced at rs 24999 sas 89
Next Stories
1 कपड्यांच्या आतमध्ये फिट होतो Sony चा नवा AC, गरमीपासून मिळेल दिलासा
2 ‘गाता रहे मेरा दिल’ ऑनलाइन गायन स्पर्धेचं आयोजन
3 अर्ध्या किंमतीत खरेदी करता येईल Samsung चा फोन, Galaxy Hours flash sale ला झाली सुरूवात
Just Now!
X