Xiaomi कंपनी आज आपला Redmi Note 9 सीरिजमधील नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. या फोनच्या ग्लोबल लॉन्चिंगसाठी एका ऑनलाइन इव्हेटंचं कंपनीने आयोजन केलं आहे. भारतीय वेळेनुसार हा इव्हेंट संध्याकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास सुरू होईल. हा इव्हेंट तुम्ही कंपनीच्या यूट्यूब किंवा सोशल मीडिया अकाउंट्सद्वारे लाइव्ह पाहू शकता.

शाओमीचा हा नवीन फोन Redmi Note 9 असू शकतो. याशिवाय कंपनी या इव्हेंटमध्ये भारताव्यतिरिक्त अन्य मार्केटसाठी Redmi Note 9 Pro आणि Redmi Note 9 Pro Max हे फोन देखील लॉन्च करण्याची शक्यता आहे. भारतात हे दोन फोन कंपनीने गेल्या महिन्यातच लॉन्च केले आहेत. पण, अन्य काही देशांतील मार्केटमध्ये हे दोन फोन अद्याप लॉन्च झाले नाहीयेत.

गेल्या महिन्यात शाओमीने Redmi Note 9 Pro आणि Redmi Note 9 Pro Max हे फोन लॉन्च केले, त्यावेळीच Redmi Note 9 हा फोनही लॉन्च होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, त्यावेळी याबाबत घोषणा करण्यात आली नव्हती. 30 एप्रिल रोजी नवीन रेडमी नोट 9-सीरिज फोन लॉन्च करणार असल्याची माहिती कंपनीने ट्विटरद्वारे दिली आहे. पण, हा फोन कोणता आहे आणि यात कोणते फीचर्स आहेत याबाबत कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही.

या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हिलियो जी 85 प्रोसेसरसह 6.53 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले मिळू शकतो. कंपनी हा फोन क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप आणि होल-पंच डिस्प्ले डिझाइनसह आणेल अशी चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच शाओमीने रेडमी नोट 9एस हा फोनही लॉन्च केला आहे. त्यानंतर आता रेडमी नोट 9 सीरिजमध्ये कंपनी अजून एक फोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.