Xiaomi ची सब-ब्रँड कंपनी रेडमीने भारतातील स्‍मार्ट बँड मार्केटमध्ये एन्ट्री केली आहे. कंपनीने भारतात आपला पहिला स्‍मार्टबँड Redmi Smart Band लाँच केलाय. Redmi Smart Band ची किंमत 1,599 रुपये आहे. हा स्मार्ट बँड एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 14 दिवसांपर्यंत बॅकअप देतो असं कंपनीने म्हटलं आहे.

ग्रीन, ब्लॅक, ब्लू आणि ऑरेंज अशा चार कलरच्या पर्यायांमध्ये हा स्मार्ट बँड खरेदी करता येईल. हा फिटनेस बँड 50 पेक्षा जास्त पर्सनलाइज्‍ड डायल आणि 24 तास हार्ट रेट मॉनिटरिंग सेन्सरसोबत येतो. आजपासून (दि. 9) Redmi Smart Band ची विक्री सुरू झाली आहे. दुपारी एक वाजेपासून अ‍ॅमेझॉन इंडियाच्या वेबसाइटवर या स्मार्ट बँडसाठी सेलला सुरूवात झाली आहे. याशिवाय कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरुनही (Mi.com)हा स्मार्ट बँड खरेदी करता येईल.

रेडमीच्या या स्मार्ट बँडमध्ये 1.08 इंचाचा एलसीडी कलर डिस्प्ले दिला आहे. हा बँड Mi Band 4 पेक्षा मोठा आहे. Mi बँड 4 मध्ये 0.95 इंच एमोलेड स्क्रीन आहे. रेडमी बँडमध्ये पाच प्रोफेशनल स्पोर्ट्स मोड्स आणि स्लीप क्वालिटी अ‍ॅनालिसिस हे फीचरही आहेत. रेडमी स्मार्ट बँड 5ATM वॉटर रेसिस्टन्ससोबत येतो. म्हणजे 50 मीटर पाण्यात 10 मिनिटासाठी राहिल्यानंतरही स्मार्ट बँड खराब होत नाही. याशिवाय कनेक्टेड अँड्रॉइड व आयओएस डिव्हाइसचे नोटिफिकेशनही बँडमध्ये युजरला दिसतात. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये ब्लूटूथ 4.2 सपोर्ट हे. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर हा बँड 14 दिवसांचा बॅकअप देतो असा कंपनीा दावा आहे. याशिवाय या विअरेबल स्मार्टबँडमध्ये USB प्लग आहे. त्यामुळे चार्जिंगसाठी कस्टम चार्जरची गरज लागत नाही.