रिलायन्स जिओने टेलिकॉम मार्केटमध्ये प्रवेश केल्यापासून जोरदार स्पर्धा सुरु झाली आहे. जिओनेही सातत्याने आपल्या ग्राहकांना नवनवीन ऑफर्स देऊन खूश केले आहे. सुरुवातीला मोफत इंटरनेट, मग स्वस्तात मस्त मोबाईल आणि आताही अतिशय कमी किमतीत इंटरनेट आणि कॉलिंग सुविधा देत ग्राहकांची मने जिंकली आहेत. नुकताच कंपनीने आपला एक अनोखा प्लॅन जाहीर केला असून त्याअंतर्गत कंपनीने आपल्या खास ग्राहकांना २ जीबी जास्तीचा डेटा देण्याचे ठरवले आहे. हा मोफत २ जीबी डेटा ५ दिवसांसाठी मिळणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे एकूण १० जीबी डेटा ग्राहकांना मिळणार आहे.
या ऑफरचे नाव सेलिब्रेशन असून ती जिओच्या ठराविक युजर्ससाठीच असेल. तुम्हाला या ऑफरविषयी माहिती हवी असेल तर माय जिओ अॅपमध्ये ती मिळू शकणार आहे. हा पॅक कधी संपणार हेही याच अॅपमध्ये कळू शकणार आहे. त्यामुळे आपण या ऑफरसाठी पात्र आहोत की नाही हे ग्राहकांना अॅपमध्ये जाऊन तपासावे लागणार आहे. ही ऑफर ३० नोव्हेंबरपर्यंत लागू असल्याचे कंपनीने सांगितले आहे. ही ऑफर कंपनीच्या वर्धापनदिनानिमित्त सप्टेंबरमध्ये जाहीर करण्यात आली होती. मात्र आता ती प्रत्यक्षात लागू करण्यात आली आहे. याआधी कंपनीने १४९ रुपयांच्या प्लॅनवर १०० टक्के कॅशबॅक दिली होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 27, 2018 2:27 pm