टेलकॉम कंपनी रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना झटका दिला आहे. कंपनीने आपला 98 रुपयांचा सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन बंद केला आहे. हा प्लॅन आता कंपनीच्या वेबसाइटवरुनही हटवण्यात आलाय. जिओचा हा प्लॅन वेबसाइटवर ‘अदर्स’ (Others) सेक्शनमध्ये स्मार्टफोन प्लॅन्सअंतर्गत उपलब्ध होता. पण, आता हे सेक्शनच हटवण्यात आले आहे. त्यामुळे जिओच्या प्रीपेड प्लॅन्सच्या ‘अदर्स’ सेक्शनमध्ये केवळ ‘अफॉर्डेबल पॅक्स’ आणि JioPhone प्लॅन्स उपलब्ध आहेत.

जिओने 98 रुपयांचा प्रीपेड प्लॅन बंद केल्याने आता कंपनीच्या स्वस्त प्लॅन्सची सुरूवात 129 रुपयांच्या प्लॅनपासून होत आहे. कंपनीने बंद केलेल्या 98 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 28 दिवसांची वैधता मिळत होती. या प्लॅनमध्ये युजर्सना एकूण 2GB डेटासह जिओ नेटवर्कवर मोफत कॉलिंग, तसेच युजर्सना 300 एसएमएस पाठवण्याची सुविधा होती. तर, अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी 6 पैसे प्रती मिनिट आययूसी चार्ज आकारला जात होता.

कसा आहे 129 रुपयांचा प्लॅन ?:-
आता कंपनीच्या स्वस्त प्लॅन्सची सुरूवात 129 रुपयांच्या प्लॅनपासून होत आहे.  129 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 28 दिवसांच्या वैधतेसह एकूण 2GB डेटा वापरण्यास मिळतो. याशिवाय जिओ नेटवर्कवर मोफत कॉलिंग आणि अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी १ हजार मिनिटे मिळतात. तसेच या प्लॅनमध्ये ३०० एसएमएस आणि जिओ अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शनही मिळते.