4G इंटरनेट डाउनलोड स्पीडमध्ये टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने अन्य सर्व स्पर्धक कंपन्यांवर मात केली आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ‘ट्राय’च्या ताज्या आकडेवारीनुसार, जून महिन्यात रिलायन्स जिओचा सामान्य डाउनलोड स्पीड 16.5 Mbps होता. तर, अपलोड स्पीडमध्ये व्होडाफोन-आयडियाची कामगिरी सर्वोत्तम ठरली आहे.

ट्रायच्या MySpeed पोर्टलमध्ये जिओनंतर डाउनलोड स्पीडमध्ये आयडियाचा क्रमांक आहे. जूनमध्ये आयडिया युजर्सना 8 Mbps चा डाउनलोड स्पीड मिळाला. तर, व्होडाफोन आणि एअरटेलचा सामान्य स्पीड अनुक्रमे 7.5 Mbps आणि 7.2 Mbps नोंदवण्यात आला.

अपलोड स्पीडमध्ये व्होडाफोन-आयडिया नंबर 1
अपलोड स्पीडमध्ये व्होडाफोन-आयडिया अव्वल ठरली आहे. जूनमध्ये व्होडाफोन-आयडियाचा अपलोड स्पीड 6.2 Mbps नोंदवण्यात आला. तर जिओ आणि एअरटेलचा 3.4 Mbps इतका अपलोड स्पीड होता.

मार्च- एप्रिलमध्ये स्पीड झाला कमी
टेलिकॉम कंपन्यांच्या नेटवर्क स्पीडमध्ये जून महिन्यात वाढ झालेली दिसली. तुलनेने मार्च आणि एप्रिलमध्ये स्पीड कमी झाला होता. लॉकडाउनमध्ये जिओचा डाउनलोड स्पीड कमी होऊन 13.3 Mbps, व्होडाफोनचा 5.6 Mbps, एअरटेलचा 5.5 Mbps आणि आयडियाचा 5.1 Mbps झाला होता.