20 October 2020

News Flash

डोळ्यात कचरा गेल्यावर करा ‘हे’ उपाय

अथक प्रयत्न केल्यानंतरही डोळ्यात गेलेला कचरा काढणं शक्य होत नाही

डोळे हे मानवी शरीरातील एक महत्त्वाचे ज्ञानेंद्रिय. डोळे हा अतिशय महत्त्वाचा आणि नाजूक अवयव असल्यामुळे त्याकडे विशेष लक्ष द्यावं लागतं. धूळ, माती, प्रदुषके यांच्यामुळे डोळ्यांना इजा पोहचू शकते. वातावरणातील धुलीकण डोळ्यात गेल्यानंतर डोळ्यांची जळजळ होणे, त्यातून पाणी येणे, डोळ्यात खुपणे असे अनेक त्रास संभवतात. त्यामुळे घरातून बाहेर पडताना डोळ्याची विशेष काळजी घ्यावी लागते. अनेक वेळा प्रवासादरम्यान डोळ्यामध्ये माती किंवा कचरा जातो. अथक प्रयत्न केल्यानंतरही डोळ्यात गेलेला कचरा काढणं शक्य होत नाही. अशावेळी काही सोप्या पद्धतीने आपण डोळ्यात गेलेला कचरा काढू शकतो.

१. सुती कापड पाण्यामध्ये भिजवावे. या ओल्या कापडाने डोळ्यांच्या कडा हलक्याशा दाबाव्यात. फक्त हा दाब देत असताना डोळ्यामधील कोणत्याही जागेवर जोर पडणार नाही याकडे लक्ष द्यावे.

२. डोळ्यांवर गार पाणी शिंपडावे किंवा एका बशीत पाणी घेऊन १-२ सेकंदासाठी त्यात डोळा उघडझाप करावा. हे करत असतांना डोळ्यात पाणी जातं मात्र घाबरु नये.

३. अनेक वेळा पापण्यांवर धूळ साचते अशावेळी डोळ्याच्या वरच्या बाजूला असलेल्या पापण्या खालच्या पापण्यांवर ठेवाव्यात आणि डोळ्यांची हळूहळू उघडझाप करावी.

४. डोळ्यात धूळ गेल्यास डोळ्यावर हळूवार फुंकर मारावी.

५. डोळ्यात काही गेल्यावर त्या क्षणी डोळ्यांची उघडझाप करावी. जेवढ्या लवकर तुम्ही ही कृती कराल. तेवढा डोळ्यातील कचरा दूर होण्याची शक्यता जास्त असते.
remove the waste that goes into the eye otherwise

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 3, 2019 3:16 pm

Web Title: remove the waste that goes into the eye otherwise ssj 93
Next Stories
1 पावसाळ्यात पाणी पिताना अशी घ्या काळजी…
2 11 हजार रुपयांनी स्वस्त झाला ‘हा’ शानदार स्मार्टफोन!
3 किंमत पाच लाखांहून कमी, कशी आहे ‘ही’ सात आसनी ‘कॉम्पॅक्ट एमपीव्ही’?
Just Now!
X