मानवात धावण्याच्या व्यायामाच्या तुलनेत सायकलिंगने हाडांची हानी जास्त होते, असे संशोधनात दिसून आले आहे. ज्या व्यायाम प्रकारात हाडांवर बऱ्यापैकी ताण येतो त्या धावण्यासारख्या व्यायामाने हाडांचे आरोग्य सुधारते, ज्यात वजन शरीराने तोलण्याचा संबंध येत नाही त्या सायकलिंगचा फारसा फायदा हाडांसाठी होत नाही. यापूर्वीही झालेल्या संशोधनात सायकलपटूंना हाडांचे आजार झाल्याचे दिसून आले आहे. रक्तातून हाडात जाणारे कॅल्शियम व हाडांचा ठिसूळपणा यात त्यामुळे परिणाम होतो. इटलीतील एका ऑर्थोपेडिक संस्थेतील वैज्ञानिकांच्या मते पर्वत चढून जाणारे अ‍ॅथलिट व इतरांचा तोच अनुभव आहे. ऊर्जा नियंत्रणाशी संबंधित दोन संप्रेरके व घटक आहेत त्यात ऑस्टिओकॅलसिन व पी १ एनपी ही दोन प्रथिने यात महत्त्वाची असून त्यांचा संबंध हाडांच्या निर्मितीशी आहे. त्यांचे रक्तातील प्रमाण हाडांचे आरोग्य दर्शवते. ग्लुकागोन, लेप्टिन व इन्शुलिन ही तीन संप्रेरके चयापचयाची क्रिया नियंत्रित करीत असतात व त्यामुळे शरीराची ऊर्जेची गरज कळते. ग्लुकागोन हे ऊर्जेची मागणी दाखवते तर इन्शुलिन व लेप्टिनचे वाढते प्रमाण पुरेशी किंवा जास्त ऊर्जा दाखवते. अनवाणी पायांनी धावल्याने स्मरणशक्ती वाढते असेही संशोधन नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. १७ प्रशिक्षित धावपटूत व व्यायाम न करणाऱ्या १२ युवकात ऑस्टिओकॅलसिन व पी १ एनपी यांचे प्रमाण वेगवेगळे दिसून आले. मॅरेथॉन धावणाऱ्यात ग्लुकागॉनचे प्रमाण जास्त, तर लेप्टिन व इन्शुलिनचे प्रमाण कमी दिसून आले. त्यामुळे त्यांच्यात ऑस्टिओकॅल्सिन व पी १ एनपी यांचे प्रमाणही जास्त दिसून आले.
दररोज स्त्री-पुरुषांनी आरोग्य राखण्यासाठी व्यायाम केला पाहिजे. सायकलिंग व पोहणे यापेक्षा धावण्याने कमकुवत हाडे असणाऱ्यांना जास्त फायदा होतो, असे गिवोनी लोमार्डी यांनी सांगितले. ऑस्टिओकॅल्सिनचे महत्त्व हाडांच्या वाढीत जास्त असते. ऑस्टिओकॅल्सिन हे स्वादुपिंडातील बिटा पेशींच्या संपर्कात येऊन शरीरातील ग्लुकोजच्या चयापचयात सुधारणा करते. धावण्याने शरीराचे वजन पोहणे किंवा सायकलिंगपेक्षा स्वत:लाच तोलावे लागत असल्याने हाडांच्या उती स्वादुपिंडाला ऊर्जा गरजेबाबत मदत करायला सांगतात.

vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
How To Make Gudi Padwa Sakhrechya Gathi At Home gudi padwa 2024
गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी यंदा बनवा घरीच, साखरेच्या बत्तास्यांची सोपी झटपट कृती
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?