सॅमसंग कंपनीने गॅलेक्सी जे 2 कोअर हा स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे हे मॉडेल अँड्रॉइड ओरियो (गो एडिशन) या आवृत्तीवर चालणारे आहे. या प्रणालीवर चालणारा सॅमसंगचा हा पहिला स्मार्टफोन आहे.

कमी किंमतीत अँड्रॉइडच्या अद्ययावत आवृत्तीचा आनंद घेता यावा तसेच रॅम किंवा स्टोरेज कमी असतानाही चांगला परफॉर्मन्स मिळावा या उद्देशाने गुगलने गेल्या वर्षी अँड्रॉइड गो आवृत्ती सादर केली होती.

सॅमसंगच्या या फोनमध्ये 5 इंच आकारमानाचा आणि 960 बाय 540 पिक्सल्स क्षमतेचा टिएफटी एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. याची रॅम 1 जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज 8जीबी असून मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. एलईडी फ्लॅश आणि एफ/2.2 अपर्चरसह यातील मुख्य कॅमेरा 8 मेगापिक्सल्सचा आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात 5 मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे.

6 हजार 190 रुपये इतकी या फोनची किंमत असून गोल्ड, ब्ल्यू आणि ब्लॅक या तीन रंगांमध्ये हा फोन उपलब्ध आहे. ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही प्रकारे फोन खरेदी करता येऊ शकतो.