News Flash

सॅमसंगचा मोबाईल वापरताय? मग हे वाचाच

साधरणपणे आपल्या फोनला कोणतीही समस्या उद्भवल्यास लोक फोन बंद करतात. मात्र हा कोणत्याही समस्येवरील उपाय होऊ शकत नाही.

सॅमसंग या प्रसिद्ध कंपनीच्या Samsung Galaxy S7 या स्मार्टफोनवर हॅकींग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जे ग्राहक हा फोन वापरत असतील त्यांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे. हे हॅकींग एका मायक्रोचिपच्या साह्याने होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. भारतात लाखो लोक या फोनचा वापर करत असून त्यांचे फोन हॅक होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मेल्टडाउन व्यूलेनरेबिलिटी ही हार्डवेअरमधील समस्या असून त्यामुळे कॉम्प्युटर, स्मार्टफोन आणि बाकी स्मार्ट उपकरणे खराब होतात. मात्र Samsung Galaxy S7 वर त्याचा प्रभाव पडत नव्हता. परंतु आता हा फोनही या घटकामुळे प्रभावित होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

याद्वारे बॅंकेचे व्यवहार, पासवर्ड यांबरोबरच व्यक्तीची खासगी माहिती काढण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. अशाप्रकारे हा फोन हॅक होऊ नये म्हणून ग्राहकांनी नवीन अपडेटस इन्स्टॉल करण्यास वारंवार सांगण्यात आले आहे. त्याप्रमाणे सॅमसंगचा कोणताही फोन वापरणाऱ्यांनी आपला मोबाईल लवकरात लवकर सॉफ्टवेअर अपडेट करावा असे सांगण्यात येत आहे. असे केल्याने हॅकर्स त्या डिव्हाईसपर्यंत पोहोचू शकणार नाहीत. साधरणपणे आपल्या फोनला कोणतीही समस्या उद्भवल्यास लोक फोन बंद करतात. मात्र हा कोणत्याही समस्येवरील उपाय होऊ शकत नाही असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

या प्रकारच्या हॅकींगची घटना गांभिर्याने घेणे आवश्यक असून त्याकडे दुर्लक्ष करणे सुरक्षेच्यादृष्टीने धोक्याचे ठरु शकते. आतापर्यंत याप्रकारची कोणतीही तक्रार नोंद झाली नसली तरीही ग्राहकांनी आपला फोन सतत अपडेट करावा. सध्या तरी हा एकमेव पर्याय असून याबाबत काम करणारी तज्ज्ञ मंडळी याविषयातील सखोल संशोधन करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2018 4:47 pm

Web Title: samsung galaxy s7 device on hackers target know how to save your device
Next Stories
1 BSNL चे ९ आणि २९ रुपयांचे आकर्षक प्लॅन दाखल
2 Samsung Galaxy Note 9 launch: सॅमसंगचा गॅलेक्सी नोट ९ लाँच, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत
3 दिर्घकाळ तरुण राहण्यासाठी ‘हे’ पदार्थ टाळा
Just Now!
X