सॅमसंग कंपनीने आपलं नवीन स्मार्टवॉच Galaxy Watch Active भारतात लाँच केलं आहे. सर्वप्रथम फेब्रुवारी महिन्यात एका इव्हेंटमध्ये कंपनीने या नव्या घड्याळाचं अनावरण केलं होतं. आता जवळपास चार महिन्यांनंतर कंपनीने हे वॉच भारतामध्ये अधिकृतपणे लाँच केलं आहे.  यासोबत कंपनीने गॅलेक्सी Fit  आणि  गॅलेक्सी Fit e हे डिजिटल बँड देखील सादर केलेत. 19 हजार 990 रुपये इतकी या वॉचची किंमत ठेवण्यात आली असून अॅमेझॉन इंडियाच्या संकेतस्थळावरुन किंवा सॅमसंगच्या ऑनलाइन स्टोअर्समधून हे स्मार्ट वॉच खरेदी करता येईल. ब्लॅक, डीप ग्रीन, रोझ गोल्ड आणि सिल्व्हर अशा चार रंगांचा पर्याय ग्राहकांसमोर असेल. 25 जूनपासून या वॉचची अधिकृत विक्री सुरू झाली आहे.

या स्मार्टवॉचमध्ये एक्सरसाइज ट्रॅकिंग, स्लीप ट्रॅकिंग, स्ट्रेस ट्रॅकिंग, हार्ट रेट सेंसर आणि हेल्थ ट्रॅकिंग यांसारखे अेक फीचर्स आहेत. हे वॉच म्हणजे ब्लड प्रेशर नियंत्रण करु शकणारं सॅमसंगचं पहिलं वेअरेबल उपकरण आहे. यासाठी वॉच खरेदी केल्यानंतर MY BP Lab हे अॅप डाउनलोड करावं लागेल. या स्मार्टवॉचमध्ये 1.1 इंच 360×360 पिक्सल सर्कुलर AMOLED स्क्रीन असून यावर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 चं आवरण आहे. यातील बॅटरी 230 एमएएच क्षमतेची आहे. याशिवाय यात ड्युअलकोर अॅक्सीनॉस 9110 प्रोसेसरचा वापर करण्यात आला असून टायझनवर आधारित Wearable OS 4.0 वर हे वॉच कार्यरत असेल. 768 एमबी रॅम आणि 4 जीबी इनबिल्ट स्टोरेज या वॉचमध्ये आहे. याशिवाय वायरलेस चार्जिंग सपोर्ट, ब्ल्यूटूथ 4.2, वाय-फाय बी/जी/एन, एनएफसी आणि ए-जीपीएस यांसारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स आहेत. वॉच खरेदी केल्यानंतर MY BP Lab हे अॅप डाउनलोड करावं लागेल. टायझन ओएस असल्यामुळे युज़र्स सॅमसंग गॅलेक्सी वॉच एक्टिव्हमध्ये थर्ड पार्टी अॅपदेखील अॅक्सेस करु शकतील. व्हॉइस अॅक्शनसाठी यामध्ये बिक्सबी व्हॉइस असिस्टंट इंटीग्रेशन आहे. या वॉचद्वारे युजर फोनला हातही न लावता कॉल किंवा मेसेज करु शकतील.