News Flash

Samsung ने लाँच केला नवीन फोल्डेबल स्मार्टफोन, ‘गॅलेक्सी फोल्ड सीरिज’मध्ये आला तिसरा स्मार्टफोन

Samsung Galaxy Z Fold 2 झाला लाँच

सॅमसंग कंपनीने आपला नवीन फोल्डेबल स्मार्टफोन Samsung Galaxy Z Fold 2 लाँच केला आहे. एक सप्टेंबर रोजी Unpacked Part 2 इव्हेंटमध्ये कंपनीने हा फोन लाँच केला. गॅलेक्सी फोल्ड सीरिजमधील हा तिसरा फोन आहे.  कंपनीने गेल्या वर्षी Galaxy Fold  बाजारात आणला होता, त्यानंतर फेब्रुवारीमध्ये Galaxy Z Flip हा स्मार्टफोन आणला, आणि आता कंपनीने Samsung Galaxy Z Fold 2  आणला आहे. Galaxy Z Fold 2 मध्ये मोठा आणि फ्लेक्सिबल डिस्प्ले आहे. फोनवर अल्ट्रा थीन ग्लास (UTG) प्रोटेक्शन असून यात ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. फोनमध्ये ‘वायरलेस पॉवर शेअर’ हे फीचरही मिळेल.

किंमत :-

यापूर्वी गेल्या महिन्यात झालेल्या गॅलेक्सी Unpacked 2020 इव्हेंट’ मध्ये कंपनीने Samsung Galaxy Z Fold 2 फोनची झलक दाखवली होती. आता कंपनीने फोनच्या किंमतीचाही खुलासा केला आहे. अमेरिकेत या फोनची किंमत $1,999  म्हणजे जवळपास 1 लाख 48 हजार 300 रुपये ठेवण्यात आली आहे. पण, भारतात फोनची किंमत नेमकी किती असेल याबाबत अजून माहिती देण्यात आलेली नाही. हा फोन mystick black आणि mystic bronze अशा दोन कलर व्हेरिअंटमध्ये मिळेल. अमेरिकेत 18 सप्टेंबरपासून फोनच्या विक्रीला सुरूवात होणार आहे. कंपनीने हा फोन Thom Browne एडिशनमध्येही आणला आहे, त्याची विक्री 25 सप्टेंबरपासून सुरू होईल.  ।

फीचर्स:-
फोनमध्ये नवीन कॅमेरा सिस्टिम, मोठा एक्स्टर्नल डिस्प्ले व त्यामध्ये पंचहोल कॅमेरा आहे. Galaxy Z Fold 2 स्मार्टफोनमध्ये नावाप्रममाणे दोन डिस्प्ले असतील. फोन फोल्ड झाल्यानंतर 6.2 इंचाची एक्स्टर्नल फुल साइज स्क्रीन मिळेल. तर, अनफोल्ड असताना फोनचा मुख्य डिस्प्ले 7.6 इंचाचा असेल. उत्तम इमेज क्वालिटीसाठी यावेळी कंपनीने अल्ट्रा-थिन ग्लासचा वापर केला आहे. फोनचा फ्रंट फेसिंग कॅमेरा आणि इंटर्नल कॅमेरा पंच-होल डिझाइनमध्ये दिला आहे. 5जी कनेक्टिव्हिटीच्या सपोर्टसह हा फोन mystick black आणि mystic bronze अशा दोन कलरच्या पर्यायांमध्ये येईल. फोनच्या मागील बाजूला ट्रिपल रिअर कॅमेरा (12MP + 12MP + 12MP) सेटअप मिळेल. तर, फोनच्या बाहेर आणि आत सेल्फीसाठी 10 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. या फोनमध्ये 4,500mAh क्षमतेची बॅटरीसोबतच लेटेस्ट क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 865 Plus प्रोसेसर मिळेल.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2020 11:55 am

Web Title: samsung galaxy z fold 2 launched at 1999 check specifications and other details sas 89
Next Stories
1 64MP कॅमेरा + 5,020 mAh बॅटरी ; 20 हजारांपेक्षा कमी किंमतीच्या दमदार स्मार्टफोनचा ‘फ्लॅश-सेल’
2 किंमत 10 हजार 499 रुपये ; 4GB रॅमसह 48MP क्वॉड कॅमेरा सेटअप + 5000mAh बॅटरी, ‘बजेट’ स्मार्टफोनचा ‘सेल’
3 लवकरच फक्त अर्ध्या तासात सामान पोहोचवणार Amazon, कंपनीला मिळाला ‘ग्रीन सिग्नल’
Just Now!
X