22 September 2020

News Flash

सॅमसंगने आणला नवीन फोल्डेबल फोन Galaxy Z Fold 2, जाणून घ्या फीचर्स

'गॅलेक्सी Unpacked इव्हेंट'मध्ये सॅमसंगने लाँच केले अनेक शानदार प्रोडक्ट्स

(फोटो - ट्विटर Evan Blass/@evleaks )

दक्षिण कोरियाच्या सॅमसंग कंपनीने ‘गॅलेक्सी Unpacked इव्हेंट’मध्ये अनेक शानदार प्रोडक्ट्स लाँच केले आहेत. कंपनीने Galaxy Note 20 सीरिज, गॅलेक्सी Watch 3, गॅलेक्सी Buds Live इअरफोन्स आणि गॅलेक्सी Tab S7 सीरिज आणली आहे. यासोबतच कंपनीने नेक्स्ट-जनरेशन फोल्डेबल फोन Galaxy Z Fold 2 सादर केला आहे.


Galaxy Z Fold 2 स्मार्टफोनमध्ये दोन डिस्प्ले असतील. फोन फोल्ड झाल्यानंतर 6.2 इंचाची एक्स्टर्नल फुल साइज स्क्रीन मिळेल. तर, अनफोल्ड असताना फोनचा मुख्य डिस्प्ले 7.6 इंचाचा असेल. उत्तम इमेज क्वालिटीसाठी यावेळी कंपनीने अल्ट्रा-थिन ग्लासचा वापर केला आहे. फोनचा फ्रंट फेसिंग कॅमेरा आणि इंटर्नल कॅमेरा पंच-होल डिझाइनमध्ये दिला आहे. 5जी कनेक्टिव्हिटीच्या सपोर्टसह हा फोन mystick black आणि mystic bronze अशा दोन कलरच्या पर्यायांमध्ये येईल. फोनच्या मागील बाजूला ट्रिपल रिअर कॅमेरा (12MP + 12MP + 12MP) सेटअप मिळेल. तर, फोनच्या बाहेर आणि आत 10-10 मेगापिक्सलचे फ्रंट कॅमेरे आहेत. या फोनमध्ये 4,500mAh क्षमतेची बॅटरीसोबतच लेटेस्ट क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 865 Plus प्रोसेसर मिळेल.

Galaxy Z Fold 2 हा फोन म्हणजे गेल्या वर्षी लाँच झालेल्या Galaxy Z Flip ची पुढील आवृत्ती आहे. फोनमध्ये नवीन कॅमेरा सिस्टिम, मोठा एक्स्टर्नल डिस्प्ले व त्यामध्ये पंचहोल कॅमेरा आहे. कंपनीने या फोनच्या फीचर्सबाबत माहिती दिलेली नाही. पण एक सप्टेंबरपासून या फोनसाठी प्री-ऑर्डर्स सुरू होणार आहेत. त्याचवेळी फोनच्या किंमतीचा आणि स्पेसिफिकेशन्सचा खुलासा केला जाणार आहे.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2020 12:34 pm

Web Title: samsung galaxy z fold2 introduced with larger displays inside and out check details sas 89
Next Stories
1 सहा कॅमेऱ्यांचा Realme 6 Pro आला नवीन व्हेरिअंटमध्ये, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
2 48MP कॅमेऱ्यासह 5000mAh ची दमदार बॅटरी, 15 हजारांपेक्षा कमी किंमतीतील स्मार्टफोनचा ‘सेल’
3 अनेक स्मार्टफोन्सवर भरघोस डिस्काउंट, फ्लिपकार्टवर Big Saving Days Sale झाला सुरू
Just Now!
X