केंद्र सरकारने परवडणारे व जैवविघटनशील सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देत असल्याची घोषणा केली असून प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजनेअंतर्गत अडीच रुपयाला एक सॅनिटरी नॅपकिन मिळणार आहे.हे सॅनिटरी नॅपकीन पर्यावरणस्नेही आहेत.

सुविधा ऑक्सो बायोडिग्रेडेबल सॅनिटरी नॅपकिन हे ३६०० जनऔषधी स्टोअर्समधून ३३ राज्ये व केंद्रशासित प्रदेशात उपलब्ध केले जाणार आहेत. त्याची किंमत नाममात्र असून ते पर्यावरणस्नेही आहेत, अशी माहिती रसायने व खतेमंत्री मनसुख मांडवीय यांनी सांगितले. चार पॅड्सचा संच १० रुपयांना मिळणार असून त्यामुळे गरीब महिलांची सोय होणार आहे. मांडवीय यांनी सुविधा नॅपकिन योजना गरीब महिलांसाठी सुरू केल्याचे सांगितले. या पॅड्समुळे  बाजारात स्पर्धा वाढणार असून इतर उत्पादकांनाही त्याची दखल घ्यावी लागणार आहे.

सुविधा पॅड्स हे जैवविघटनशील असून ऑक्सिजनच्या संपर्कात ते विघटनशील बनतात. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार २०१५-१६ मध्ये १५ ते २४ वयोगटातील ५८ टक्के महिला आहेत. त्या स्थानिक साधनांचा वापर करतात. ७८ टक्के शहरी महिला मात्र आरोग्यदायी पद्धतींचा वापर करतात.

४८ टक्के ग्रामीण महिलांना स्वच्छ सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध आहेत.  सरकारने सॅनिटरी नॅपकीनवर १२ टक्के जीएसटी आकारल्याने मध्यंतरी नाराजी व्यक्त करण्यात आली होती.