28 February 2021

News Flash

Saregama ने लाँच केला शानदार स्क्रीन असलेला नवीन म्युझिक प्लेअर, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Saregama ने लाँच केला लेटेस्ट म्युझिक प्लेअर Carvaan Karaoke, स्क्रीनवर दिसणार गाण्याचे बोल(लिरिक्स)....

(फोटो क्रेडिट:Saregama.com)

Saregama ने आपला नवीन म्युझिक प्लेअर Carvaan Karaoke भारतात लाँच केला आहे. या म्युझिक प्लेअरमध्ये स्क्रीन देण्यात आली आहे, त्या स्क्रीनवर गाण्याचे बोल(लिरिक्स) दिसतात. गाण्याचे बोल हिंदी आणि इंग्रजी भाषेत दिसतील. याशिवाय, उत्तम साउंड क्वालिटीसाठी यामध्ये 5W चे दोन स्पीकर आहेत. जाणून घेऊया Saregama Carvaan Karaoke ची किंमत आणि फिचर्स :-

Saregama Carvaan Karaoke ची किंमत :-
Saregama ने आपल्या लेटेस्ट Carvaan Karaoke ची किंमत 19,990 रुपये इतकी आहे. हा म्युझिक प्लेअर केवळ ‘मेटॅलिक रेड’ या एकमेव कलरमध्ये उपलब्ध असेल. कंपनीच्या अधिकृत वेबसाइट किंवा ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवरुन हा म्युझिक प्लेअर खरेदी करता येईल.

Saregama Carvaan Karaoke स्पेसिफिकेशन्स :-
Saregama Carvaan Karaoke म्युझिक प्लेअरमध्ये दोन स्क्रीन आहेत. याशिवाय डिव्हाइसमध्ये 5W चे दोन स्पीकर देण्यात आले आहेत. यासोबतच या म्युझिक प्लेअरमध्ये 1000 पेक्षा जास्त karaoke ट्रॅक मिळतील. तसेच, Saregama Carvaan Karaoke म्युझिक प्लेअरला एचडीएमआय पोर्टद्वारे प्रोजेक्टरलाही कनेक्ट करता येईल. अन्य फिचर्समध्ये कंपनीने Saregama Carvaan Karaoke मध्ये 5,000 हिंदी गाणे दिलेत. सोबतच डिव्हाइसमध्ये FM/AM रेडिओची सुविधाही मिळेल. या म्युझिक प्लेअरसोबत दोन वायरलेस माइक आणि एक रिमोट मिळेल.

मिळेल 4,000mAh ची बॅटरी :-
Saregama Carvaan Karaoke मध्ये कंपनीने 4,000mAh ची एक बॅटरी दिली आहे. ही बॅटरी एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर सहा तासांचा बॅकअप देते. या डिव्हाइसमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी युएसबी पोर्ट, एचडीएमआय आणि 3.5mm हेडफोन जॅक यांसारखे फिचर्स आहेत. तर, 2.3 किलोग्राम इतकं याचं वजन आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2020 3:43 pm

Web Title: saregama carvaan karaoke with large in built screen launched in india check price and other details sas 89
Next Stories
1 PUBG Mobile India Update: PUBG ची आतुरतेने वाट बघणाऱ्यांसाठी ‘बॅड न्यूज’ !
2 किंमत 200 रुपयांपेक्षा कमी, दररोज 2GB डेटा; BSNL ने लाँच केला शानदार प्लॅन
3 Post Office आणि Payment Bank ची सर्व्हिस आता एकाच अ‍ॅपवर, DakPay अ‍ॅप्लिकेशन झालं लाँच
Just Now!
X