देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या बचत खात्यावरील व्याज दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी SBI च्या कोट्यवधी खातेदारांना मोठा धक्का बसणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्याज दरातील कपात एक नोव्हेंबरपासून लागू होईल असं एसबीआयकडून सांगण्यात आलं आहे. बँक 1 लाख रुपयांच्या ठेवींवर पाव टक्क्यांनी कपात करणार आहे. परिणामी, नव्या नियमानुसार बचत खातेदारांना 1 लाख रुपयांच्या ठेवीवर मिळणारं व्याज साडेतीन टक्क्यांवरुन सव्वातीन टक्क्यांनी मिळेल. म्हणजेच व्याज दरात 0.25 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे.

यापूर्वी याच महिन्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) आपल्या रेपो रेटमध्ये कपात केली. त्यानंतर एसबीआयनेही आपल्या व्याज दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sbi to reduce interest rates for savings accounts from november 1 sas
First published on: 20-10-2019 at 11:53 IST