मूळच्या भारतीय संशोधकांनी अमेरिकेत संशोधन करून अस्थमा रोखण्यासाठी उपयुक्त अशा उपकरणाचा शोध लावण्यात यश मिळविले आहे. हे उपकरण व्यक्तीच्या शरीरातील रक्तदाब, हृदयाचे ठोके, या घटकांवर नियंत्रण ठेवून अस्थमाचा धोका टाळण्यास मदत करेल, असा संशोधकांना विश्वास आहे.
या उपकरणाला आरोग्य आणि पर्यावरण ट्रेकर (एचईटी) असे नाव देण्यात आले आहे. अस्थमाचे रुग्ण सध्या श्वसन पंप (इनहॅलर्स) या उपकरणावर मोठय़ा प्रमाणात अवलंबून आहेत. मात्र अस्थमाचा सामना करण्यास हे उपकरण अतिशय कमकुवत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.
अस्थमाचा सामना करण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आलेले हे उपकरण शरीरावर परिधान करता यावे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यामुळे अस्थमा रोखण्यास आणखी मदत होणार आहे. अस्थमाचा शरीरावर होणार प्रभाव रोखण्यासाठी हे उपकरण प्रभावी ठरेल, असे उत्तर कॅरोलिना विद्यापीठातील संशोधक अल्पेर बोझकुर्त यांनी सांगितले.
व्यायाम करण्याच्या वेळेत या उपकरणाचा वापर केला तरी ते प्रभावी ठरेल, असे संशोधक जेम्स डिफेंडरफर यांनी सांगितले. रक्तवाहिन्यांतील संवेदना जाणणाऱ्या या उपकरणाचा एक भाग घडय़ाळाप्रमाणे हातात घालता येईल आणि दुसरा भाग छातीवर लावणे आवश्यक आहे. छातीवरील उपकरण रुग्णाच्या हालचाली, हृदयाचे ठोके, श्वसन क्रिया, रक्तातील ऑक्सिजन आणि फुप्फुसाची क्रिया यांचा पाठपुरावा करेल, असे संशोधकांनी सांगितले आहे. तर हातात घातलेले उपकरण हवेतील पर्यावरणातील नोंदी घेणार आहे. हवेतील घटक, ओझोनचे प्रमाण, तापमान आणि आद्र्रतेचा अस्थमा रुग्णावर होणारा परिणाम तपासण्यास यामुळे मदत होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 4th Jun 2016 रोजी प्रकाशित
अस्थमा रोखण्यासाठी नव्या उपकरणाचा शोध
मूळच्या भारतीय संशोधकांनी अमेरिकेत संशोधन करून अस्थमा रोखण्यासाठी उपयुक्त अशा उपकरणाचा शोध लावण्यात यश मिळविले आहे.

First published on: 04-06-2016 at 01:17 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Searching new device to prevent asthma