भविष्य निर्वाह निधी हा एक महत्त्वाचा निधी असतो. २० कर्मचाऱ्यांहून अधिक कर्मचारी असणाऱ्या प्रत्येक संस्थेला कर्मचाऱ्याच्या भविष्य निर्वाह निधीसाठी योगदान द्यावे लागते. EPFO (Employees’ Provident Fund Organisation) हे कामगार आणि रोजगार मंत्रालयांतर्गत येते. भविष्यनिर्वाह निधीचे कर्मचारी आणि कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या योगदानावर नजर ठेवण्यात येते. पूर्वी तुम्ही नोकरी बदलली तर तुम्हाला नव्याने पीएफ अकाऊंट उघडावे लागायचे. मात्र मोदी सरकारने ही प्रक्रिया काहीशी सुलभ केली. त्यामुळे आता तुम्ही कितीही नोकऱ्या बदलल्या तरी तुमचे पीएफ अकाऊंट एकच राहते. तुम्हाला हा भविष्य निर्वाह निधी दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करायचा असेल तर त्यासाठी काही महत्त्वाचे टप्पे आहेत. पाहूयात हे टप्पे कोणते…

१. ईपीएफच्या वेबसाईटवर जाऊन अवर सर्व्हीसेस या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर एम्प्लॉईजमध्ये जा.

२. त्यानंतर member UAN/ online service (OCS/OTP) यावर क्लिक करा.

३. तुम्हाला तुमचा UAN म्हणजेच Universal Account Number क्रमांक विचारण्यात येईल. त्यानंतर पासवर्ड टाकल्यानंतर कॅपचामध्ये आलेले आकडे आणि अक्षरे टाका.

४. यानंतर आणखी एक पेज ओपन होते. त्यात तुम्हाला ऑनलाईन सर्व्हीसेसमध्ये One member – one EPF account (transfer request) यावर क्लिक करायचे आहे.

५. मग तुम्ही शेवटच्या टप्प्यावर येता तिथे तुम्हाला पुन्हा UAN आणि तुमच्या रजिस्टर केलेल्या मोबाईलवर येणारा OTP टाकावा लागतो. त्यानंतर सबमिट या पर्यायावर क्लिक करा म्हणजे तुमचा हा निधी ट्रान्सफर होतो.