त्वचेच्या कर्करोगाने ग्रस्त असलेल्यांना इतर प्रकारच्या कर्करोगांचाही धोका उद्भवण्याची शक्यता असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. त्वचेच्या कर्करोगामुळे मेलॅन्मो आणि इतर २९ प्रकारच्या कर्करोगांचा धोका निर्माण होऊ शकतो.  
संशोधनातून समोर आलेल्या अहवालानुसार, ज्या व्यक्तींना नोमेलॅन्मो या त्वचेचा कर्करोग आहे. त्यांना या कर्करोगाच्या प्रकारासोबत इतर प्रकारचेही कर्करोग जखडू शकतात आणि २५ वर्षांखालील त्वचेच्या कर्करोग्यांमध्ये इतर कर्करोगाचे प्रकार जलद गतीने डोके वर काढतात.
त्यामुळे ज्या व्यक्तींना त्वचेचा कर्करोग आहे आणि त्यांचे वयही २५ वर्षांखाली आहे अशांना कर्करोगाचा धोका अधिक असतो. त्वचेचा कर्करोग हा कर्करोगाचा सामान्य प्रकार आहे. त्यामुळे यावर वेळीच लक्ष दिले गेले, तर त्याचे निदानही लगेच करता येते.
कर्करोगाचा प्रकार जरी सामान्य असला, तरी त्याकडे दुर्लक्ष करणे भविष्यात महागात पडू शकते. कारण, या कर्करोगामुळे इतर प्रकारच्या कर्करोगांना वाव मिळतो आणि मोठा धोका उद्भवू शकतो असेही त्वचेच्या कर्करोगाबाबतीत केलेल्या अहवालात म्हटले आहे.