इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी सोनीने भारतामध्ये BRAVIA मास्टर मालिकेतील दोन शानदार टीव्ही लॉन्च केले आहेत. 55 इंच आणि 65 इंचाचे हे दोन टीव्ही आहेत. अनुक्रमे KD-55A9F आणि KD-65A9F अशी या दोन्ही टीव्हीची नावं असून OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. 20 सप्टेंबरपासून विक्री सुरू होणार आहे. टीव्हीवरील दृष्य प्रत्यक्षात पाहिल्याचा भास तुम्हाला होईल असं कंपनीने म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ब्राविया OLED टीव्हीमध्ये नेटफ्लिक्स, वॉइस सर्च, सेंटर स्पीकर यांसारखे अनेक फिचर्स देण्यात आले आहेत. याशिवाय हे टीव्ही अॅन्ड्रॉइड ओरियो 8.0 ऑपरेटिंग सिस्टीमवर कार्यरत असतील. तसंच एक्स 1 अल्टिमेट इमेज प्रोसेसर आणि पिक्सल कॉन्ट्रॅस्ट बूस्टर हे फीचरही दोन्ही टीव्हीमध्ये आहेत. 4 के HDR 10 चा सपोर्ट असल्यामुळे अत्यंत उच्चदर्जाची दृष्य पाहण्याची मजा घेता येईल.

कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये ब्लूटूथ 4.2, 4 HDMI पोर्ट्स, 3 युएसबी पोर्ट, हेडफोन जॅक आणि डिजिटल ऑडियो आउटपुट आहे 16 जीबी स्टोरेज टीव्हीमध्ये असून गुगल होम असिस्टंट आणि व्हॉइस कंट्रोलचे फिचर आहेत. या टीव्हीद्वारे घरातील इतर स्मार्ट उपकरणं ऑपरेट देखील करता येणार आहेत. माइक्रोफोन टीव्हीमध्ये इनबिल्ट असल्यामुळे तुम्हाला कोणता टीव्ही शो, सिनेमा किंवा जे पाहायचं असेल त्याचा केवळ आदेश द्यावा लागेल. 11 भारतीय भाषा आणि 14 आंतरराष्ट्रीय भाषांचा सपोर्ट आहे.

55 इंच टीव्हीची किंमत 3 लाख 99 हजार 990 रुपये आणि 65 इंच टीव्हीची किंमत 5 लाख 59 हजार 990 रुपये आहे. येत्या काही वर्षांमध्ये महागड्या उत्पादनांमधून जास्त परतावा मिळण्याची अपेक्षा कंपनीला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sony launches a9f bravia oled master series television
First published on: 18-09-2018 at 15:21 IST