05 December 2020

News Flash

तब्बल 100 तासांचा बॅटरी बॅकअप ; अमेरिकी कंपनीने भारतात लाँच केले ‘वायरलेस ईअरबड्स’

केवळ 10 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 90 मिनिटे म्युझिक बॅकअप...

अमेरिकी कंपनी Anker ने भारतात “ साउंडकोर लाइफ डॉट 2 ब्लूटूथ हेडसेट” लाँच केले आहेत. या वायरलेस ईअरबड्सच्या बॅटरीबाबत कंपनीने तब्बल 100 तासांचा बॅकअप मिळतो असा दावा केला आहे. यासोबत तुम्हाला 18 महिन्यांची वॉरंटीही मिळेल. ब्लॅक फिनिशिंगमध्ये येणाऱ्या या ईअरबड्सची किंमत 3,499 रुपये आहे.

या ईअरबड्समध्ये मोनो ऑडिओ आणि स्टीरिओ ऑडिओ हे फीचरही आहे. म्हणजे एक ईअरबड्स चार्जिंग केसमधून बाहेर काढल्यास तो आपोआप मोनो ऑडिओ मोडवर स्विच होईल, आणि दुसरा काढल्यास तो स्टीरिओ ऑडिओ मोडवर जाईल. “लाइफ डॉट 2 ब्लूटूथ हेडसेट”मध्ये ‘पुश अँड गो’ (Push and Go) टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. म्हणजे ईअरबड्स चार्जिंग बॉक्समधून काढताच ते तुमच्या ब्लूटूथ पेयर्ड डिव्हाइसशी आपोआप कनेक्ट होतील.

याच्या बॅटरीबाबत कंपनीने 100 तासांचा बॅकअप मिळतो असा दावा केला आहे. यात फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे. केवळ 10 मिनिटांच्या चार्जिंगमध्येच हे ईअरबड्स 90 मिनिटांचा म्युझिक बॅकअप देतात असं कंपनीने म्हटलंय. या ईयरबड्समध्ये शानदार फिटिंगसाठी सिलिकॉन कोटिंग देण्यात आली आहे. याशिवाय यात 8 एमएम ट्रिपल लेयर ड्राइव्हर्सचा वापर करण्यात आला आहे. याद्वारे म्युझिकदरम्यान 40 टक्के लो-फ्रीक्वेन्सी (बास) आणि 100 टक्के हाय फ्रीक्वेन्सी (ट्रेबल) मिळते. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये ब्लूटूथ 5.0 चा सपोर्ट आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2020 1:33 pm

Web Title: soundcore life dot 2 tws earbuds by anker launched in india check price specifications sas 89
Next Stories
1 घरवापसी? टाटा समूह एअर इंडिया विकत घेण्याच्या तयारीत
2 आता अ‍ॅमेझॉनद्वारे ऑर्डर करा औषधेही, कंपनीने लाँच केली ‘अ‍ॅमेझॉन फार्मसी’
3 गुगल प्ले-स्टोअर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरने हटवला लोकप्रिय ‘ऑनलाइन बॅटल गेम’, कारण…
Just Now!
X