पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय यांच्या सहकार्याने, होरायझन्स सेंटर फॉर कल्चरल स्टडीज या गेली बारा वर्षे कार्यरत असलेल्या आस्थापनाचा ‘दुर्ग – शास्त्र, स्थापत्य व मीमांसा’ हा सहा महिने कालावधीचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम ३ नोव्हेंबर पासून सुरू होत आहे…

या अभ्यासक्रमात, दुर्ग वा गड वा किल्ले अशा अनेक नावांनी ओळखल्या जाणाऱ्या इतिहासपुरुषाची यथार्थ ओळख करून दिली जाईल…

दर शनिवारी सायंकाळी २-५ या वेळेत, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे कार्यालय, सेंट जॉर्ज रुग्णालयाचे आवार, सीएसएमटी, येथे हे वर्ग सुरू राहतील…या अभ्यासक्रमासाठी शिक्षणाची अट नाही. केवळ विषयाची आवड असणं आवश्यक आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करायचा असेल तर डॉ. मिलिंद पराडकर यांच्याशी ९६१९००६३४७, ८१६९४४८७५७ या क्रमांकावर संपर्क साधावा.

(आणखी वाचा – भारताची संस्कृती आणि वारसा अभ्यासकांसाठी चांगली संधी )