दरवर्षी येणाऱ्या सणांसाठी आपल्याला काही वेगळ करायचं असतं. दरवर्षी येणारा तोचतोचपणा टाळायचा असतो. दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळी म्हटली की नवीन कपड्यांबरोबरच येतात ते छान छान दागदागिने. सध्याच्या दिवाळीत काय काय दागिने ट्रेण्ड इन आहेत, ते कसे वापरायचे याबद्दल आपल्याला माहीत असलंच पाहिजे. सध्या फेस्टिव्हल्ससाठी अनेक चांगल्या अ‍ॅक्सेसरीज आपल्याला मिळू शकतात. त्यामुळे तुम्हाला एक मस्त लुक मिळू शकतो. काही पारंपरिक दागिन्यांना एक हटके लुक देऊन या अ‍ॅक्सेसरीज डिझाइन केल्या जातात. मांग टिका, कमरबंध, बांगडय़ा अशा प्रकारचे साधे पण सध्या इन असलेले दागिने तुम्ही वापरू शकता.

सणावाराच्या दिवसात सुंदर डिझाइन केलेला मांगटीका खूपच उठून दिसेल. त्याचे अनेक डिझायनर प्रकार असतात. कमरबंध खूप एलेगन्ट आणि स्टायलिश लुक देऊन जाईल. आणि नेहमीच्या पद्धतीने दोन्ही हातात बांगडय़ा घालण्याऐवजी एकाच हातात भरपूर बांगडय़ा घाला. केसांसाठी छान छान हेड गियर्स, वेगवेगळे हेयर बॅण्ड्स वापरून तुमच्या लुकला तुम्ही मॉडर्न ट्विस्ट देऊ शकता. तेव्हा केस मोकळे सोडा, खूप कुल आणि हटके लुक मिळेल.

Grill coriander garlic fish recipe in marathi
ग्रिल्ड कोरिएन्डर गार्लिक फिश; असा बनवा कुरकुरीत मसाला फिश फ्राय
Premier League Football Manchester City emphatic win sport news
प्रीमियर लीग फुटबॉल: मँचेस्टर सिटीचा दमदार विजय
Real Madrid and Manchester City draw match
चॅम्पियन्स लीग फुटबॉल : रेयाल-मँचेस्टर सिटीतील रंगतदार लढत बरोबरीत
Airtel Xtreme
लाईट्स, कॅमेरा, XStream : तुमचं वन स्टॉप एन्टरटेन्मेंट हब

तसेच या वेळी पैंजण, अँक्लेट्स यांना खूप डिमांड असते. एकाच पायात घातल्या जाणाऱ्या या दागिन्यात खूप वैविध्य बघायला मिळते. बारीक, जाड, नाजूक कुंदन वर्क, पातळ दोऱ्यात मणी ओवून बनविलेले अँक्लेट्स किंवा वेगवेगळे डिझाईन असलेले नाजूक अँक्लेट्स इत्यादी प्रकार अँक्लेट्समध्ये दिसून येत आहेत. सध्या एकदम इन असलेला प्रकार म्हणजे तोडा. जाडसर दिसणारा हा गोल तोडा घातल्यावर मात्र खूपच भाव खाऊन जातो. रस्ट, सिल्वर, गोल्ड, कॉपर यांमध्ये अँक्लेट्स उपलब्ध आहेत. पैंजणांमध्येसुद्धा खूपच नवनवीन प्रकार पाहायला मिळत आहेत. कुंदन वर्क केलेले पैंजण, विविध रंगांच्या खडय़ांचे पैंजण, मोती आणि हिऱ्यांचं कॉम्बो असलेले पैंजण इत्यादी प्रकार बाजारात मिळत आहेत. त्याचबरोबर पारंपरिक पैंजणांनासुद्धा मुली पसंती देत आहेत. भरपूर घुंगरू असलेले न वाजणारे पैंजण सध्या मुलींच्या पसंतीस उतरत आहेत.

अँक्लेट्स, पैंजण कसे घालावे..

शक्यतो मोठय़ा मण्यांचे अँक्लेट्स किंवा पैंजण टाळावे, त्यामुळे कुल किंवा फंकी दिसण्यापेक्षा बाळबोध लुक येईल. आपल्याला शोभतील असे, सुंदर डिझाइन असलेले अँक्लेट्स किंवा पैंजण निवडावेत. लेहेंगा, पतियाळा सलवार, लाँग स्कर्ट इत्यादी आउटफिट्सवर अँक्लेट्स खूपच कुल दिसतील. त्यातसुद्धा तोडा अतिशय खुलून दिसेल. पारंपरिक कपडय़ांवर पैंजण चालतात अशी संकल्पना प्रचलित आहे. परंतु हल्ली डेनिम्सवर सुद्धा पैंजण घालायचा ट्रेण्ड आलेला आहे. डेनिम्सवर खूप नाजूक किंवा खूप हेवी असे पैंजण उठावदार दिसतात. अँकल लेन्थ डेनिमवर तर अजूनच कुल लुक मिळतो. त्याचबरोबर आपल्या आवडीनुसार तुम्ही कधी आणि कशावर ते घालायचे ते ठरवू शकता. या अँक्लेट्सचं वैशिष्टय़ म्हणजे एकदा पायात घातले की सतत बदलावं लागत नाही. आणि त्याचं वजन खूपच कमी असल्याने तोही त्रास नसतो. जेव्हा तुम्ही पूर्ण लांबीचे कपडे घालता तेव्हाही मधून मधून डोकावणारे हे अँक्लेट भाव खाऊन जातात. त्यामुळे तुमच्या आवडीनुसार हे अँक्लेट्स आणि पैंजण ट्राय करून बघा. या नवरात्रीत तुम्ही लेहेंगा किंवा दुपट्टा याला मॅचिंग पैंजण वापरू शकता. तुमच्या कपडय़ांना साजेसे अँक्लेट्ससुद्धा तुम्ही वापरू शकता.

प्राची परांजपे

छायाचित्र सौजन्य – शुभिक देवडा

सौजन्य – लोकप्रभा
response.lokprabha@expressindia.com