14 October 2019

News Flash

‘पल्सर’ला टक्कर देणार ‘सुझुकी’ची Gixxer 250 !

या बाइकच्या पुढील बाजूला टेलिस्कोपिक फोर्क आणि रिअरमध्ये मोनोशॉक सस्पेंशन

Suzuki आपली बहुप्रतीक्षित Gixxer 250 ही बाइक 20 मे रोजी भारतात लाँच करणार आहे. मात्र, लाँच होण्याआधीच या बाइकचे काही फोटो आणि स्पेसिफिकेशन सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सुझुकीची ही बाइक सध्या बाजारात असलेल्या बजाज पल्सर आरएस 200, यामाहा फेझर 25 आणि होंडा सीबीआर 250 आर यांसारख्या बाइक्ससाठी तगडं आव्हान निर्माण करेल. व्हायरल झालेल्या फोटोंवरुन या नव्या बाइकचं डिझाइन सुझुकीच्याच GSX-R या मॉडेलमधून प्रेरित असल्याचं दिसतं.

या बाइकच्या इंजिन कव्हरला आकर्षक गोल्ड फिनिशिंग देण्यात आली आहे. या बाइकमध्ये 249cc सिंगल-सिलिंडर, ऑइल-कुल्ड, फ्युअल इंजेक्टेड SOHC इंजिनचा वापर करण्यात आला आहे. हे इंजिन 9000 rpm वर 26 bhp पावर आणि 7500 rpm वर 22.6 Nm पीक टॉर्क जनरेट करतं. यासोबत 6-स्पीड गिअरबॉक्सचा पर्याय आहे. क्लिप-ऑन हँडलबारमुळे या बाइकची रायडिंग पोझिशन अधिक अग्रेसिव्ह (आक्रमक) दिसतेय.

सुझुकीच्या या स्पोर्ट्स बाइकच्या पुढील बाजूला टेलिस्कोपिक फोर्क आणि रिअरमध्ये मोनोशॉक सस्पेंशन आहेत. दोन्ही बाजूंना डिस्क ब्रेक आहेत. ड्युअल चॅनल एबीएस हे फीचर देखील बाइकमध्ये आहे. 12 लिटरची पेट्रोल टाकी असलेल्या या बाइकचं वजन 161 किलो आहे. लाँच होईपर्यंत या बाइकच्या किंमतीबाबत सांगणं कठीण आहे, मात्र बाजारात बजाज पल्सर आणि यामाहा फेझर यांसारख्या बाइक्सना टक्कर देण्यासाठी कंपनी या बाइकची किंमत जवळपास 1.40 लाख रुपये इतकी ठेवण्याची शक्यता आहे.

First Published on May 13, 2019 1:50 pm

Web Title: suzuki gixxer sf 250 launch on 20th may its image brochure leaked