लँड रोव्हरचा टच लाभलेली टाटा हॅरियर आता भारतीय रस्त्यांवर धुमाकूळ घालताना दिसणार आहे. कारण, अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर बुधवारी(दि.23) टाटाची हॅरियर ही एसयुव्ही श्रेणीतील गाडी अखेर भारतीय बाजारात लाँच झाली आहे. चार व्हेरिअंटमध्ये ( XE, XM, XT आणि XZ) ही आकर्षक कार लाँच करण्यात आली असून 12.69 लाख रुपये इतकी या कारच्या बेसिक व्हेरिअंटची किंमत आहे. नवीन ओमेगा प्रकारचं या गाडीत आर्किटेक्चर असून प्रथमच लँडरोव्हरचा प्लॅटफॉर्म वापरण्यात आला आहे. या कारचे लुक्स काहिसे आक्रमक ठेवण्यात आले असून ऑटो एक्स्पो 2018 मध्ये सादर करण्यात आलेल्या एच5एक्स या कन्सेप्टशी मिळती जुळती ही गाडी आहे. टाटाच्या इम्पॅक्ट 2 डिझाईनचा या मॉडेलवर प्रभाव आहे. ही कार एसयुव्ही सेगमेंटमध्ये नवे बेंचमार्क निश्चित करेल असा विश्वास कंपनीनं व्यक्त केला आहे.

किंमत –
Harrier XE – 12.69 लाख रुपये
Harrier XM – 13.75 लाख रुपये
Harrier XT – 14.95 लाख रुपये
Harrier XZ – 16.25 लाख रुपये

ifs officer parveen kaswan shares video of forester extinguishing terrible forest fire goes viral
जंगलात लागली भयानक आग, झाडे झाली जळून खाक! आग शमविताना झाली वनकर्मचाऱ्यांची दमछाक, पाहा थरारक Video
chip manufacturing infrastructure
पोस्टाच्या तिकिटाएवढी दिसणारी सेमीकंडक्टर चिप नक्की कशी तयार होते?
navy deployed 11 submarines in indian ocean
विश्लेषण : एकाच वेळी ११ पाणबुड्या हिंद महासागरात तैनात… भारतीय नौदलाचे चीनवर लक्ष?
Tata Altroz Racer to launch in coming weeks
मारुती, महिंद्रा, ह्युंदाईची उडाली झोप, टाटा ‘या’ हॅचबॅक कारला देशात आणतेय स्पोर्टी अवतारात; कधी होणार विक्री?

2018 ऑटो एक्स्पोमध्ये या गाडीचे कन्सेप्ट सर्वप्रथम दाखवण्यात आले होते तेव्हापासून या गाडीबाबत लोकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. हॅरीअरला एक आक्रमक आणि भारदस्त एसयूव्ही बनवण्यासाठी टाटाने मेहनत घेतली आहे. ही कार थर्मिस्टो गोल्ड, कॅलिस्टो कॉपर, एरियल सिल्व्हर, टेलिस्टो ग्रे आणि ऑर्कस व्हाइट अशा पाच रंगात उपलब्ध असणार आहे. सिटी, इको आणि स्पोर्ट्स अशाप्रकारच्या तीन ड्रायव्हिंग मोड्समध्ये ही कार उपलब्ध असेल.

हॅरिअरचं हे पाच आसन व्यवस्था असलेलं व्हर्जन आहे. कंपनी सात आसन क्षमता असलेलं व्हर्जनही लवकरच लाँच करणार असल्याचं सांगितलं जातंय. मात्र नेमकं केव्हा हे व्हर्जन लाँच होणार याबाबत अद्याप कंपनीकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

जाणून घेऊया हॅरियर एसयूव्हीची खासियत –
टाटा हॅरियर नव्या OMEGARC प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. टाटा मोटर्स आणि जॅग्वार लँड रोव्हर यांनी ही कार डेव्हलप केलीये. गाडीची लांबी 4598 mm, रुंदी 1894 mm आणि उंची 1706 mm आहे, तर व्हिलबेस 2741 mm आणि ग्राउंड क्लिअरंस 205 mm आहे. या दमदार कारमध्ये तुम्हाला 50-लीटर क्षमतेचा फ्युअल टँक मिळेल. याशिवाय रेडियल टायरसोबत 17-इंच अॅलॉय व्हिल्ज असेल. या कारमध्ये 2.0-लीटर क्रायोटेक डिझेल इंजिन देण्यात आलंय. हे इंजिन 3750 rpm वर 138 bhp पावर आणि 1750-2500 rpm वर 350 Nm पीक टॉर्क जनरेट करतं. चार सिलिंडर मोटर 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येणारी ही एसयूव्ही सध्या पेट्रोल इंजिन, ऑटोमॅटिक ट्रांसमिशन आणि ऑल व्हिल ड्राइव व्हर्जनमध्ये नाही मिळणार. सिटी, इको आणि स्पोर्ट्स अशाप्रकारच्या तीन ड्रायव्हिंग मोड्समध्ये ही कार उपलब्ध असेल. यामध्ये नॉर्मल, रफ आणि वेट मोड्ससह टेरेन रिस्पॉन्स सिस्टिमही उपलब्ध असेल. हॅरियरच्या समोरील बाजूस मॅकफर्सन स्ट्रट्ससोबत इंडिपेंडेंट फ्रंट सस्पेंशन आणि मागील बाजूला सेमी-इंडिपेंडेंट ट्विस्ट ब्लेड सेटअप आहे. ब्रेकिंगबाबत सांगायचं झाल्यास याच्या पुढील बाजूला डिस्क आणि मागील बाजूला ड्रम ब्रेक आहेत.

फीचर्स –
या एसयूव्हीमध्ये अनेक शानदार फिचर्स आहेत. एकूण चार व्हेरिअंट्समध्ये ही कार उपलब्ध असेल. यामध्ये एक्सई, एक्सएम, एक्सटी आणि एक्सझेडचा समावेश आहे. यामध्ये फॉलो-मी-होम फंक्शनसह प्रोजेक्टर लेंस हेडलॅम्प्स, एलईडी डे-टाइम रनिंग लाइट्स, फॉग लॅम्प, एलईडी टेललाइट्स आणि आउट साइड व्ह्यू मिररमध्ये टर्न इंडिकेटर्स आहेत. कॅबिन फॉक्स वुड इंसर्ट्ससोबत ब्लॅक आणि ब्राउन कलर थीम आहे. यामध्ये प्रीमियर फॅब्रिक आणि लेदर अपहोल्स्ट्रीचा पर्याय मिळेल. हॅरियरमध्ये पूश बटन स्टार्ट-स्टॉप, सेमी-डिजिटल इंस्ट्रूमेंट कंसोल, मल्टी-फंक्शन स्टिअरिंग व्हिल, हाइट अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, ऑटो क्लायमेट कंट्रोल आणि कूल्ड ग्लवबॉक्स आहे. 8.8 इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम कारमध्ये आहे. ही इन्फोटेनमेंट सिस्टिम अॅपल कार-प्ले, अँन्ड्रॉइड ऑटो, मिरर लिंक आणि नेव्हिगेशन सपोर्टसह आहे. टॉप व्हेरिअंट्समध्ये 9-स्पीकर जेबीएल ऑडियो सिस्टिम मिळेल. यामध्ये सर्व अत्याधुनिक सुरक्षाविषयक फिचर्सचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये सिटबेल्ट रिमाइंडरसह 3-पॉइंट सिटबेल्ट्स देण्यात आले आहेत. एसयूव्हीमध्ये 6-एअरबॅग्स, ISOFIX सिट्स, इबीडी, एबीएस, कॉर्नर स्टॅबिलिटी कंट्रोलसह ईएसपी, ऑफ रोड एबीएस, ट्रॅक्शन कंट्रोल, हिल होल्ड कंट्रोल, हिल डीसेंट कंट्रोल, रोलओव्हर मिटिगेशन आणि ब्रेक असिस्ट यांसारखे अनेक फिचर्स आहेत. थर्मिस्टो गोल्ड, कॅलिस्टो कॉपर, एरियल सिल्व्हर, टेलिस्टो ग्रे आणि ऑर्कस व्हाइट या कलर्समध्ये ही कार खरेदी करता येईल.