हस्तकलेतून साकारलेले दागिने, काचेच्या बाटलीवरील सुंदर नक्षीकाम, कागदापासून तयार केलेल्या वस्तू अशा अनेक सर्जनशील वस्तूंचे प्रदर्शन येत्या ७ आणि ८ मे रोजी मुंबईकरांना अनुभवण्याची संधी मिळणार आहे. हस्तकलेची आवड असणाऱ्या मुंबई-पुण्यातील मैत्रिणींनी एकत्र येऊन तंबू मार्केट ही संकल्पना साकारली आहे. तर अनेक मैत्रिणी उच्च पदाची नोकरी सोडून स्वत:चा उद्योग सुरु करण्याच्या इच्छेने तंबू मार्केटमध्ये सामील झाल्या आहेत.
हस्तकला, चित्रकला अशा अनेक कलांच्या साहाय्याने वस्तू तयार करणे आणि आपल्यातील कलागुणांना वाट करुन देणे हा या प्रदर्शनाचा मुख्य हेतु आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून कलेमध्ये आवड असणारी अनेक मंडळी जोडली जातात असे तंबू मार्केटच्या संस्थापक गायत्री चाव्हरेकर यांनी सांगितले. इमिटेशन दागिन्याऐवजी ग्राहकांनी कागद, ताबांची तार, कापड, रेशीम यांपासून तयार करण्यात आलेले दागिने जास्त आवडतात. या प्रदर्शनात ग्राहकांना वेगळ्या प्रकारचे दागिने, माळा पाहायला मिळणार आहे.
तर पैठणीचे ड्रेसेस, बांधणी कापडाच्या पर्सेस अशा अनेक वस्तू ‘बॅगवाली’ या विभागात पाहायला मिळतील. नक्षीकाम तर कधी तागाच्या दोऱ्याच्या साहाय्याने काचेच्या बाटलीवर कलाकुसर करण्यात आली असून या नक्षीकाम केलेल्या वस्तू टेबलावर शोभेच्या वस्तू म्हणून ठेवल्या जातात. तंबू मार्केटमधील एक मैत्रिणीने झाडावरुन पडलेल्या फुलांना वाळवून त्यापासून फ्रेम, ग्रंथ खुणा, घडय़ाळ, स्टॅंड अशा अनेक तयार वस्तू प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत. येथे वस्तूंबरोबर खाण्याच्या वस्तू, मसाले, सात प्रकारच्या चकल्यांचा आस्वाद घेता येणार आहे.
प्रदर्शन पाहत असताना ग्राहकांना कलात्मक वस्तू तयार करण्याची इच्छा असेल तर ते तंबू मार्केटमधील कार्यशाळेत सहभागी होऊ शकतात. या कार्यशाळेत सहभागी व्यक्तींना त्याच्या कल्पनेनुसार नव्या वस्तू तयार करता येणार आहे. ही कार्यशाळा एक तासाची घेण्यात येणार आहे. तंबू मार्केट हे प्रदर्शन ७ ते ८ मे रोजी दादरच्या शिवाजी पार्क जवळील स्काऊट गाईड पॅव्हेलियन येथे आयोजित करण्यात आले आहे.

किड्झ मंडई
लहान मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे यासाठी तंबू मार्केटमध्ये यावेळी लहान मुलांनी तयार केलेल्या वस्तू प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहे. ८ ते १६ वयाची मुले या प्रदर्शनात सहभागी होऊ शकतात. लहान मुलांमध्ये नेहमीच नवीन संकल्पना साकारण्याची आस असते मात्र त्यांची कौशल्ये ही घरांच्या चारभिंतीपर्यंत सीमित राहतात. मुलांच्या कलात्मक वृत्तीला प्रोत्साहन मिळावे यासाठी प्रदर्शनामध्ये मुलांनी तयार केलेल्या वस्तू, चित्र आदी प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहे. इच्छुक व्यक्तींसाठी संपर्क क्रं- ९८२०७८७५२८.

Loksatta kutuhal Endowment of Suryaji Pisala Artificial intelligence
कुतूहल: सूर्याजी पिसाळांचा बंदोबस्त
How to treat heat-related illnesses
उष्णतेच्या लाटेचा कसा करावा सामना? सरकारने मार्गदर्शक सुचना केल्या जारी
Municipal Corporation ignoring quakes in navi mumbai delayed in making rule for builders
नवी मुंबई : हादऱ्यांच्या मालिकेकडे महापालिकेचा काणाडोळा, बिल्डरांच्या सोयीसाठी नव्या नियमावलीला मुहूर्त सापडेना
diver artist uma mani began exploring new depths to life at age 49
४९ व्या वर्षी शिकल्या स्कुबा डायव्हिंग; आज समुद्र संरक्षणासाठी करतायत मोलाचे काम; कोण आहेत उमा मणी?