वाहन खरेदी करण्याआधी अनेक विचार आपल्या मनात येतात, आणि त्यातील बहुतांश समस्यांवर डिलरकडे गेल्यानंतर उत्तर मिळतं. पण शेवटपर्यंत ग्राहक संभ्रमात असतो तो म्हणजे कारच्या रंगाबाबत. कोणत्या रंगाची कार घ्यावी याबाबत कार खरेदी करण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत ग्राहक द्विधा मन:स्थितीत असतो.

पेंट क्षेत्रातील दिग्गज कंपनी BASF च्या अहवालानुसार, 2018 मध्ये 43 टक्के भारतीयांनी पांढऱ्या रंगाची कार खरेदी केली. भारतीयांची सर्वाधिक पसंती पांढऱ्या रंगाच्या छोट्या कारला असते असं या अहवालातून दिसतं. ‘याच्या मागील कारण म्हणजे भारतातील उष्णता. पांढरा रंग लवकर गरम होत नाही त्यामुळे भारतीयांचा कल पांढऱ्या रंगाकडे असू शकतो’ असं बीएएसएफचे अधिकारी चिहारु मतसुहारा यांनी सांगितलं.

या अहवालानुसार भारतीयांची दुसऱ्या क्रमांकाची पसंती ग्रे रंगाला आहे. तर तिसरा क्रमांकावर सिल्व्हर कलर आहे. याशिवाय लाल रंगाच्या कार 9 टक्के जणांना, निळ्या रंगाच्या कार 7 टक्के तर काळ्या रंगाच्या कारला केवळ तीन टक्के लाोकांना आवडतात.