28 September 2020

News Flash

मॅरेथॉनमध्ये सहभागी होताय? हे वाचाच…

स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत यशस्वीपणे पोहोचण्यासाठी आधी कोणती तयारी करायची आणि मॅरोथॉनमध्ये पळून आल्यानंतर काय काळजी घ्यावी याबाबत माहिती असणे आवश्यक आहे.

प्रातिनिधिक छायाचित्र

आपल्यातील अनेक जण विविध संस्था- संघटनांनी आयोजित केलेल्या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेत असतात. स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत यशस्वीपणे पोहोचण्यासाठी आधी कोणती तयारी करायची आणि मॅरोथॉनमध्ये पळून आल्यानंतर काय काळजी घ्यावी याबाबत माहिती असणे आवश्यक आहे. काही दिवसातच पूनावाला क्लीन सिटी मॅरेथॉन होत असल्याच्या निमित्ताने मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्यांसाठी काही खास टीप्स…

१. योग्य प्रशिक्षण घ्या
मॅरेथॉनमध्ये धावणे हे कठीण वाटते तितके सोपे काम नाही. त्यामुळे तुमचे शरीर तंदुरूस्त नसल्यास, मॅरेथॉन पूर्ण करणे कठीण असते. परंतु नाराज होऊ नका कारण काही मार्गदर्शक आणि प्रशिक्षक तुम्हाला तुमचा आहार, वेळापत्रक, रेसिंग धोरण आणि हायड्रेशन या सर्वांबाबत मॅरेथॉनच्या अनेक आठवडे आधी मार्गदर्शन करु शकतात. त्यांची योग्य ती मदत घ्या.

२. तुमच्या आहारावर नियंत्रण ठेवा
स्पर्धेचा दिवस जवळ येतो तसतसे तुम्हाला कर्बोदकांमधून जास्तीत-जास्त ऊर्जा साठवणे गरजेचे असेल. कमी कर्बोदकांनी युक्त आहार, प्रथिनांनी युक्त आणि फॅटमध्ये कमी असेल तर तुमच्या शरीराला त्या मॅरेथॉनसाठी आवश्यक ते सर्व पोषक घटक देईल.

३. भरपूर पाणी प्या
मॅरेथॉनच्या आदल्या दिवशी भरपूर पाणी प्‍यायल्याने शेवटच्या ओळीपर्यंत तुम्ही हायड्रेटेड राहाल. परंतु अती पाणी पिऊ नका कारण ते तुमच्या शरीराला घातक ठरेल.

४. योग्य कपडे घाला
तुम्हाला हे मजेशीर वाटेल, परंतु मॅरेथॉनसाठी तुम्ही ज्या प्रकारच्या कपड्यांची निवड करता त्याची तुमच्या कामगिरीमध्ये महत्त्वाची भूमिका असते. सहजपणे घाम न शोषणारे कपडे घातल्याने तुम्हाला उबदार वाटेल आणि तुम्ही लवकर डिहायड्रेट व्हाल व अपेक्षेपेक्षा खूप लवकर तुम्ही थकून जाल. त्यामुळे घाम शोषून घेतील असे कपडे घातलेले केव्हाही चांगले.

मॅरेथॉननंतर ही काळजी घ्या

१. ऊर्जा पुन्हा मिळवा
तुम्ही पहिली गोष्ट केली पाहिजे ती म्हणजे थोड्या वेळानंतर हळूहळू खायला आणि प्यायला सुरूवात करा. तुमच्या शरीराचा थकवा टाळण्यासाठी चरबीयुक्त पदार्थ तसेच सहजपणे पचन न होणारे पदार्थ टाळा.

२. चालत राहा
थकल्यामुळे सोफ्यावर बसून राहणे हा योग्य पर्याय नाही. त्यामुळे धावून आल्यानंतर तुमच्या आसपासच्या परिसरात चालत राहिल्याने तुमच्या स्नायूंवर ताण येत नाही.

३. मसाज- गोळ्या
गोळ्या प्रत्येक वेळी फायदेशीर ठरतीलच असे नाही, कारण तुमच्या थकवा भरून काढण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेत त्यांचा अडथळा होऊ शकतो. तुम्ही वेगवान सुधारणेसाठी हलका मसाज किंवा खेळाचा मसाज करुन थकवा घालवू शकता.

४. मन भरेपर्यंत झोपा
तुमची मॅरेथॉन झाल्यानंतर भरपूर झोप घ्या. शरीर थकल्याने त्याला जास्तीत जास्त आरामाची गरज आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 25, 2018 7:07 pm

Web Title: things you should do before and after participating in a marathon
Next Stories
1 विराटचं दिवाळी स्पेशल कलेक्शन पाहिलंत का?
2 होम लोन घेताय? या १० गोष्टी माहिती हव्यातच…
3 इंडिगोचा दिवाळी सेल : करा स्वस्तात विमान प्रवास
Just Now!
X