लहान मुले अनेकदा अंगठा चोखतात किंवा नखे खातात, त्यामुळे काही पालक त्यावर उपायही करतात. पण त्यांचे हे लक्षण त्यांच्यात अ‍ॅलर्जीबाबत संवेदनशीलता वाढवण्यास मदत करते, असे नव्या संशोधनात आढळून आले आहे. संशोधकांनी म्हटले आहे की, जर मुलांना या दोन्ही वाईट सवयी (आपल्या म्हणण्याप्रमाणे) असतील तर त्यांना अ‍ॅलर्जीचा धोका कमी असतो. त्यांना गवत, मांजरी, कुत्रे, घोडे, हवेतील बुरशी यांची अ‍ॅलर्जी असत नाही. कमी वयात घाण किंवा जंतूंचा सामना करावा लागला तर नंतरच्या काळात अ‍ॅलर्जी राहत नाही, असा नवा आरोग्य सिद्धांत आम्ही मांडला आहे, असे कॅनडातील मॅकमास्टर विद्यापीठाचे माल्कम सियर्स यांनी सांगितले. असे असले तरी त्यांनी केवळ या कारणाकरिता मुलांनी तसे करण्याचे समर्थनही केलेले नाही. अशा सवयींना सकारात्मक बाजू असू शकते एवढेच त्यांचे म्हणणे आहे. संशोधकांच्या मते लहानपणी मुले जेव्हा अंगठा चोखतात किंवा नखे कुरतडतात तेव्हा त्यांच्यात सूक्ष्मजीवांना सामोरे जाण्याची सवय वाढते, त्यामुळे अ‍ॅटॉपिक सेन्सिटायझेशन ही अ‍ॅलर्जीची क्रिया होत नाही. अंगठा चोखणे किंवा नखे कुरतडण्याची सवय अनेकांना असते. न्यूझीलंडमध्ये ५,७,९,११ या वयोगटातील १००० मुलांमध्ये याबाबत अभ्यास केला असतात त्यांच्यात अ‍ॅटॉपिक सेन्सिटायझेशन कमी झाले. १३ ते ३२ वयोगटात त्यांचे स्किन प्रीक टेस्टिंग करण्यात आले. यातील ३१ टक्के मुले नियमितपणे अंगठा चोखणारी व नखे कुरतडणारी होती. १३ वर्षे वयात ४५ टक्के मुलांत अ‍ॅटॉपिक सेन्सिटायझेशन दिसून आले, पण त्यांच्यापैकी ४० टक्के मुलांमध्ये अ‍ॅलर्जी कमी होती व त्यांना लहानपणी अंगठा चोखण्याची सवय होती हे त्यामागचे कारण होते. दोन्ही सवयी असलेल्यांमध्ये केवळ ३१ टक्क्यांमध्ये अ‍ॅलर्जी होती. प्रौढपणातही त्यांच्यात तेच निष्कर्ष कायम राहतात व कुत्रे, मांजरी, सूक्ष्मजीव यांच्यामुळे त्यांना अ‍ॅलर्जीचे प्रमाण कमी असते, असे जर्नल पेडियाट्रिक्समध्ये म्हटले आहे.

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.) 

How Sugar Effects On body can digestive cookie make you fat
बिस्किटाच्या पुड्यात किती साखर असते? क्रीम, गोडाची व चटपटीत बिस्किटांची निवड करताना काय बघावं?
flowers, plant flowers,
निसर्गलिपी : हिरवा कोपरा
printed receipts toxic body experts stop you must not touch those printed receipts heres why
खरेदीनंतर मिळणाऱ्या पावतीला स्पर्श करणे आरोग्यासाठी ठरतेय घातक? डॉक्टर काय सांगतात? वाचा
Why are naphthalene balls kept with clothes to be put away How do you use naphthalene balls in a wardrobe
कपड्यांमधील ओलसरपणा, कुबट वास होईल गायब; कपाटात ठेवा ‘ही’ गोळी, जाणून घ्या वापराची योग्य पद्धत