News Flash

दर तासाला तब्बल एक लाख वेळेस डाउनलोड, ‘टिकटॉक’वरील बंदी ‘चिंगारी’च्या पथ्यावर

अचानक डाउनलोडिंगमध्ये वाढ झाल्याने चिंगारीचं सर्व्हर डाउन झालं होतं, कंपनीचे को-फाउंडर म्हणाले...

चिनी अ‍ॅप टिकटॉकला टक्कर देणाऱ्या मेड इन इंडिया अ‍ॅप चिंगारीची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. सरकारने टिकटॉकवर बंदी घातल्यानंतर चिंगारी अ‍ॅप डाउनलोड करणाऱ्यांमध्ये अचानक मोठी वाढ झाली आहे. चिंगारीचे को-फाउंडर आणि चीफ प्रोडक्ट ऑफिसर सुमित घोष यांनी दर तासाला एक लाख वेळेस चिंगारी अ‍ॅप डाउनलोड होत असल्याची माहिती दिली आहे. अचानक डाउनलोडिंगमध्ये वाढ झाल्याने चिंगारी अ‍ॅपचं सर्व्हर डाउन झालं होतं, त्यानंतर घोष यांनी लोकांना थोडा धीर ठेवा अशी विनंती ट्विटरद्वारे केली.


शॉर्ट व्हिडिओ मेकिंग सेगमेंटमधील आघाडीच्या टिकटॉक या चिनी अ‍ॅपला पर्याय म्हणून ‘चिंगारी’ (Chingari) अ‍ॅप गेल्या काही दिवसांपासून चांगलंच लोकप्रिय ठरत आहे. TikTok ला भारतीय पर्याय असलेलं हे अ‍ॅप छत्तीसगडचे आयटी प्रोफेशनल्स आणि ओडिशा व कर्नाटकच्या डेव्हलपर्सनी बनवलं आहे. “हे अ‍ॅप बनवण्यासाठी जवळपास दोन वर्षांचा कालावधी लागला. खास भारतीय युजर्सच्या गरजा आणि आवड लक्षात घेऊ हे अ‍ॅप डिझाइन करण्यात आलं आलं आहे”, असं भिलाईमधील रहिवासी आणि चिंगारी अ‍ॅपचे चीफ ऑफ प्रोडक्ट सुमित घोष यांनी यापूर्वी सांगितलं होतं.

चिंगारी अ‍ॅप नोव्हेंबर 2018 मध्ये गुगल प्ले स्टोअरवर अधिकृतपणे आलं होतं. पण काही दिवसांपासून भारतात चिनी सामानांचा बहिष्कार करण्याची मागणी जोर धरु लागल्यानंतर चिंगारीच्या डाउनलोडिंगमध्ये मोठी वाढ झाली.  विशेष म्हणजे या अ‍ॅपने आता प्ले स्टोअरमध्ये फ्री अ‍ॅप्सच्या टॉप चार्टमध्ये जागा मिळवली आहे.

ओडिशाच्या विश्वात्मा नायक आणि कर्नाटकच्या सिद्धार्थ गौतम यांनी हे अ‍ॅप डेव्हलप केलं आहे. भारतात तयार केलेलं हे अ‍ॅप TikTok ला थेट टक्कर देतंय. चिंगारी अ‍ॅपद्वारे तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बनवू शकतात आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअरही करु शकतात. अ‍ॅपमध्ये शानदार फीचर्स असून भारतीय भाषांचा सपोर्टही आहे. याशिवाय अ‍ॅपमध्ये ट्रेंडिंग न्यूज, एंटरटेनमेंट न्यूज, फनी व्हिडिओ, लव स्टेटस, व्हिडिओ साँग असे अनेक फीचर्स आहेत. चिंगारीवर शेअर केलेल्या पोस्टवर लाइक, कॉमेंट, शेअर करता येतील. व्हॉट्सअपवर शेअर करण्यासाठी वेगळा पर्याय आहे. एखाद्या युजरला फॉलो करण्याचाही पर्याय यामध्ये देण्यात आला आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 30, 2020 1:32 pm

Web Title: tiktoks indian chingari registers 100000 downloads per hour after govt bans 59 china apps sas 89
Next Stories
1 दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी ठरली Airtel , पण ‘या’ कंपनीने गमावले लाखो ग्राहक
2 …म्हणून मूगडाळ भजी अधिक आरोग्यदायी; जाणून घ्या रेसिपी आणि फायदे
3 शाओमीच्या पाच कॅमेऱ्यांच्या बजेट फोनचा ‘फ्लॅशसेल’, जाणून घ्या बेस्ट ऑफर्स
Just Now!
X