रिलायंस जिओ, व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेलने आपले प्रीपेड प्लॅन्स महाग केलेत. एअरटेल आणि व्होडाफोनने काही दिवसांपूर्वी आपल्या ग्राहकांना दिलासा देताना अन्य नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सेवा दिली. जिओ अद्यापही आपल्या युजर्सकडून इतर नेटवर्कवर कॉल करण्यासाठी 6 पैसे प्रति मिनिट आकारत आहे. एअरटेल, व्होडाफोन-आयडियाने एकीकडे ग्राहकांना दिलासा दिला असताना दुसरीकडे त्यांच्या ग्राहकांसाठी एक ‘बॅड न्यूज’देखील आहे.

प्रीपेड प्लॅन महाग केल्यानंतरही एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया कंपन्यांनी मिनिमम रिचार्ज पॉलिसी(किमान रिचार्ज) बंद केलेली नाही. टॅरिफ दरवाढीनंतर मिनिमम रिचार्ज पॉलिसी बंद होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. म्हणजेच, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाच्या ग्राहकांना आपले प्रीपेड मोबाइल नंबर सुरू ठेवण्यासाठी दर महिन्याला रिचार्ज करणं बंधनकारक असेल. यामुळे, तुम्ही जर एका सिमकार्डवर केवळ इनकमिंग कॉल्स घेत असाल, तर अशी फ्री इनकमिंगची सेवा तुम्हाला मिळणार नाही. तुम्हाला दर महिन्याला किमान एकदा रिचार्ज करावेच लागणार आहे. तसे न केल्यास इनकमिंग कॉल्सची सेवा बंद होईल. नवे टॅरिफ प्लॅन लागू झाल्यानंतर एअरटेलकडे मिनिमम रिचार्जसाठी २३ रुपये आणि व्होडाफोन-आयडियाकडे 24 रुपयांचा रिचार्ज आहे. याशिवाय 49 रुपये आणि 79 रुपयांचाही प्लॅन आहे. या तिन्ही प्लॅनमध्ये ग्राहकांना डेटा किंवा टॉक टाइम किंवा एसएमएस सेवा मिळणार नाही. केवळ प्रीपेड अकाउंटची वैधता वाढेल. एअरटेलच्या 23 रुपयांच्या रिचार्जची वैधता 28 दिवस आहे, तर व्होडाफोन-आयडियाचा 24 रुपयांच्या प्लॅनची वैधता 14 दिवसांची आहे.

tax harvesting in marathi
Money Mantra: टॅक्स हार्वेस्टिंग म्हणजे काय? त्याचा वापर कसा कराल? केव्हा टाळाल?
boys did dangerous stunt with car to make reels video went viral on social media
रिल्ससाठी जीवघेणा स्टंट! मित्राला प्लास्टिकच्या रॅपरमध्ये गुंडाळले अन् चालत्या कारच्या बाहेर…
Sales of e-vehicles pune
गडकरींनी वारंवार सांगूनही लोकांनी फिरवली पाठ! ई-वाहनांच्या विक्रीला गती मिळेना
RBI Monetary Policy Meeting 2024 Repo Rate Unchanged Marathi News
RBI MPC Meet : रेपो दरात कोणताही बदल नाही; रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, कर्जदारांना दिलासा!

एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया या दोन्ही कंपन्यांनी ऑक्टोबर 2018 पासून मिनिमम रिचार्ज पॉलिसी लागू केली आहे. कंपन्यांना आपल्या ARPU म्हणजेच अ‍ॅव्हरेज रेव्हेन्यू पर युजर (प्रति ग्राहक सरासरी महसूल) मध्ये खूप नुकसान होत होते. या नुकसानभरपाईसाठी मिनीमम रिचार्ज पॉलिसी लागू करण्यात आली.